Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket League : मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण

मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांना एकत्र आणणारी ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ लवकरच रंगणार असून, स्पर्धेच्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात अनेक कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 11, 2026 | 04:56 PM
मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण

मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण

Follow Us
Follow Us:

रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या बहुचर्चित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ च्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अनेक मान्यवर, कलाकार आणि क्रिकेटप्रेमी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’चे सामने १४ आणि १५ मे २०२६ रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर रंगणार आहेत. ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’मध्ये ६ संघ असून त्या संघांचे नेतृत्व लोकप्रिय कलाकारांकडे सोपविण्यात आले आहे. अभिनेता विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा रायझिंग’, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘वीर मराठा’ संघ मैदानात उतरणार आहेत. तसेच नुपूर दुधवडकर ‘मर्द मराठा’ संघाची धुरा सांभाळणार आहेत. हरीश दुधाडे ‘स्टार मराठा’ संघाचे नेतृत्व करणार असून कांचन पगारे ‘मराठा शिलेदार’ आणि सागर कारंडे ‘मराठा वॉरियर’ संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

राजकीय नेते श्रीकांत भारतीय आणि मंगेश सांगळे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती. ‘कलाकारांमध्ये मैत्री आणि क्रीडाभावना वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी कलाकारांचा हा अनोखा क्रिकेट महोत्सव अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

१४ आणि १५ मे ला रंगणाऱ्या ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’च्या आयोजनामध्ये संचित यादव आणि शितल कल्लापुरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या सहकार्याने आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे कार्यक्रमाची आकर्षक मांडणी करण्यात आली. यावेळी अधिकृत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले तसेच विशेष डिझाइन केलेल्या आकर्षक टी-शर्टचे सादरीकरणही करण्यात आले. लीगसाठी पंडित राठोड, सचिन खंडागळे, संदीप राठोड, ओमकार सर आणि अखिलेश चौबे,भरत नाना पाटील यांचे प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले आहे. मनोरंजन क्षेत्रातील मराठी कलाकारांना एकत्र आणून मैत्री आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा या लीगचा मुख्य उद्देश असल्याचे मंगेश सांगळे आणि संचित यादव यांनी सांगितले.

‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून कलाकारांमधील मैत्री, टीमवर्क आणि प्रेक्षकांशी असलेले नाते अधिक दृढ करणारा उपक्रम मानला जात आहे. या स्पर्धेत विविध संघ सहभागी होणार असून, अनेक लोकप्रिय कलाकार मैदानात क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या लीगबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

समारंभात सादर करण्यात आलेली ट्रॉफी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तसेच प्रत्येक संघासाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत टी-शर्टची झलकही उपस्थितांना पाहायला मिळाली. आकर्षक डिझाइन आणि रंगसंगतीमुळे टी-शर्टलाही चांगली पसंती मिळाली. मनोरंजन आणि क्रीडा यांचा अनोखा मिलाफ घडवणारी ही लीग प्रेक्षकांसाठी मोठा आकर्षण ठरणार असून, आगामी सामन्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Usha Chavan : जेष्ठ अभिनेत्रीकडून सरकारवर नाराजी! आयुष्यभरात कमावलेली सगळी मानचिन्ह ठाण्यात दिघे समाधीस्थळी करणार अर्पण

Web Title: Rangkarmi cricket league trophy tshirt launch news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • cricket league
  • entertainment
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’
1

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.