फोटो सौजन्य :गुगल
‘राजा शिवाजी’ सिनेमाचं कलेक्शन
पहिला दिवस – 12.40 कोटी
दुसरा दिवस – 11.50 कोटी
तिसरा दिवस – 13.10 कोटी
चौथा दिवस – 6.20 कोटी
पाचवा दिवस – 5.40 कोटी
सहावा दिवस – 4.70 कोटी
सातवा दिवस – 4.40 कोटी
आठवा दिवस -3.50कोटी
नववा दिवस (दुसरा शनिवार) – 6.20 कोटी
दहावा दिवस (दुसरा रविवार) 7.60 कोटी
एकूण कलेक्शन – 75.10 कोटी
सिनेमा रिलिज झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने केवळ भारतातच नाही तर जगभरात आपली छाप सोडली असून आतापर्यंतचं सिनेमाचं कलेक्शन 80 कोटींपर्यंत गेलं आहे, अशी माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिली. ! महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ रुपेरी पडद्यावरील एक ऐतिहासिक मांडणी नसून, प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा हुंकार आहे. दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख यांनी मोठ्या पडद्यावर शिवरायांचा इतिहास मांडला, त्यामुळे हा चित्रपट केवळ पाहण्याचा विषय न उरता तो एक भावनिक अनुभव ठरतो. सिनेमाच्या लोकप्रियतेबाबत आणखी सांगयाचं तर बुक माय शो (Book My Show ) वर देखील सर्वाधित या सिनेमाची विक्री होत आहे. त्याचबरोबर IMDb वर देखील सर्वाधिक रेटींग मिळाली आहे.
Raja Shivaji सिनेमातील नवंकोरं गाणं आलं समोर! सई राणीसाहेबांच्या प्रेमाची झलक ‘फूल पारिजात’






