Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत झळकणार स्नेहल शिदम, ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती; कथेत नवा ट्विस्ट

अभिनेत्री स्नेहल शिदम एका वेगळ्या आणि आकर्षक अंदाजात दिसणार असून तिची एन्ट्री ‘इन्स्पेक्टर मंजू मालिकेत नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे. मालिकेत अभिनेत्री आर्यनच्या आत्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 24, 2026 | 05:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘इन्स्पेक्टर मंजू’ या ‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री स्नेहल शिदम एका वेगळ्या आणि आकर्षक अंदाजात दिसत असून तिची एन्ट्री मालिकेत नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे.

मालिकेत स्नेहल शिदम आर्यनच्या आत्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये आत्या सत्याला पाहताच त्याच्या प्रेमात पडल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कथानकात लव्ह ट्रँगलची भर पडणार असून सत्या, मंजू आणि आत्या यांच्यातील नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे होणार आहेत.या नव्या वळणामुळे मालिकेत रोमांच आणि ड्रामा वाढणार असून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘इन्स्पेक्टर मंजू’सोबतच ‘जुळली गाठ गं’ या मालिकेतही रोमँटिक सणवाराचे खास भाग पाहायला मिळणार आहेत.हा विशेष भाग येत्या २६ एप्रिलला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता प्रसारित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे.

या नव्या भूमिकेबद्दल अभिनेत्री स्नेहल शिदम म्हणाली की, ” पुन्हा एकदा सन मराठीच्या सुपरहिट मालिकेत काम करण्याची संधी मिळाली याचा प्रचंड आनंद आहे. ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही मालिका मी आणि माझं कुटुंब न चुकता पाहतो. त्यामुळे कुटुंबातही प्रचंड आनंद झाला आहे. मालिकेत आर्यनची आत्या ही भूमिका मी साकारत आहे. पहिल्यांदा अस मजेशीर रोमँटिक पात्र माझ्या वाट्याला आलं आहे त्यामुळे थोडी धाकधुक होते. पण सेटवर सगळे इतके भन्नाट आहेत की प्रत्येक सीन आम्ही एन्जॉय करत शूट करतो. शूटिंगच्या मधल्या वेळातही नॉन स्टॉप गप्पा, धमाल , मस्ती सुरू असते. ही भूमिका सत्या मंजूच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन येणार आहे. प्रत्येक एपिसोड पाहताना प्रेक्षकांना धमाल येणार आहे. ”

Kajol On Kissing Scene: काजोलने मोडला स्वतःचाच नियम, सीरिजमध्ये दिला किसिंग सीन; अभिनेत्रीने सांगितले कारण

पुढे स्नेहल म्हणाली की, ” या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू आहे त्यामुळे सातारा म्हटलं की जणू स्वर्गच. आपण जिथे शूटिंग करतो तिकडचं वातावरण भन्नाट असेल तर काम करताना देखील मज्जा येते. यासाठी मी लगेच या भूमिकेसाठी होकार दिला. नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांनी पहिला. हा प्रोमो पाहून माझ्या मित्र मैत्रिणींचे मेसेज मला आले. कारण त्या प्रोमोमध्ये आत्याची एन्ट्री होताच ती सत्याच्या प्रेमात पडल्याचं दिसतयं. त्यात माझा लुक देखील वेगळा आहे. खरंच हे सगळ खूप भारी वाटत आणि मालिका पाहताना प्रेक्षकांना देखील मज्जा येईल.”

RJ Sumit : एका संत्र्यामुळे दोन्ही किडन्या निकाम्या, मरणाच्या दारातून परतला आरजे सुमित; सांगितला आजारपणाचा धक्कादायक प्रसंग

Web Title: Snehal shidam to be seen in a romantic role for the first time new promo of inspector manju wins audience approval brings a fresh twist to the story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
1

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
2

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.