Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial Update : ‘मालिका बंद होणार? पण आहे एक ट्विस्ट’ अमोल कोल्हेंची ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका चर्चेत

Star Pravah वाहिनीने सहा नवीन मालिकांची घोषणा करून प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन मालिकांसाठी जागा निर्माण करण्यासाठी काही जुन्या मालिकांना निरोप दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका बंद होण्याची चर्चा जोरात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 31, 2026 | 04:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेकांच्या आवडत्या नावडत्या मालिका बंद होण्याची शक्यता अफाट आहे.
  • टेन्शन घेण्याची गरज नाही!
  • नवीन मालिकांसाठी जागा!
Star Pravah ने सहा नव्या मालिकांची घोषणा करून मालिकाप्रेमींना भेट तर दिलीच आहे पण त्याचबरोबर मालिकाप्रेमींना धक्काही मिळणार आहे. कारण जर सहा नव्या मालिका येत आहेत तर नक्कीच काही मालिकांना राम-राम तर करावाच लागणार आहे. अशामध्ये अनेकांच्या आवडत्या नावडत्या मालिका बंद होण्याची शक्यता अफाट आहे. यादरम्यान अमोल कोल्हे यांची मालिका ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ बंद होणाऱ्या मालिकांच्या यादीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतेय. या मालिकेच्या चाहत्यांना मालिकेला निरोप द्यावा लागेल की काय? या चर्चांना उधाण आले आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका कमी टीआरपीमुळे बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, ही मालिका सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी केलेला संघर्ष दाखवणारे कथानक अद्याप प्रसारित व्हायचे आहे. या भागासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सहा विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी ऑडिशन्सही घेण्यात आल्या होत्या. मात्र हे महत्त्वाचे कथानक येण्यापूर्वीच मालिकेच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Suna Yeti Ghara : आता TV समोर होणार तरुणांची गर्दी! ‘सुना येती घरा’ मालिकेत झळकणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री

टेन्शन घेण्याची गरज नाही!

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका बंद तर होणारच आहे परंतु त्यासाठी किमान 3 महिन्यांची कालावधी आहे. 3 महिन्यांनंतर या मालिकेचे प्रक्षेपण थांबवण्यात येणार आहे. तसेच या जागी नव्या मालिकांची भरती तर होतच आहे.

नवीन मालिकांसाठी जागा

दरम्यान, स्टार प्रवाहने नव्या मालिकांची घोषणा करत आपला कार्यक्रमपट बदलण्याची तयारी केली आहे. ‘सुना येती घरा’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिचा प्रोमो सध्या 7.30 वाजताच्या स्लॉटमध्ये दाखवला जात आहे. याच वेळेत सध्या ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका प्रसारित होते.

Vaishnavi Kalyankar : कोकणची लेक! “बालपणाची आठवण आली” अभिनेत्रीने शेअर केला खास कोकणी अंदाज

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी कलाकारांबाबत मोठी उत्सुकता होती आणि अमोल कोल्हे तसेच मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही प्रमाणात मालिकेला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मालिकेच्या बंद होण्यामागील नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Star pravah new serial shakeup for mi savitribai jyotirao phule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • amol kolhe
  • marathi
  • Savitribai Phule Pune University
  • star pravah

संबंधित बातम्या

Suna Yeti Ghara : आता TV समोर होणार तरुणांची गर्दी! ‘सुना येती घरा’ मालिकेत झळकणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री
1

Suna Yeti Ghara : आता TV समोर होणार तरुणांची गर्दी! ‘सुना येती घरा’ मालिकेत झळकणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री

Marathi Medium : मराठी अस्मितेचा जागर होणार! मालिकेत झळकणार, सोशल मीडिया स्टार श्रद्धा पवार
2

Marathi Medium : मराठी अस्मितेचा जागर होणार! मालिकेत झळकणार, सोशल मीडिया स्टार श्रद्धा पवार

Visaru nako tu mala : Promo असा की कधीच विसरणार नाही! Music पण A1 अन् कलाकारांची निवडही नंबर वन
3

Visaru nako tu mala : Promo असा की कधीच विसरणार नाही! Music पण A1 अन् कलाकारांची निवडही नंबर वन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.