फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणतेय वैष्णवी कल्याणकरची पोस्ट?
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री कोकणात जाऊन कोकणचा मेवा म्हणजेच काजू भाजताना दिसत आहे. हल्ली शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांना या पद्धतीचा विसर पडला आहे. परंतु, शहरात राहणारी कोकणी अभिनेत्री कोकणात जाऊन आजही या सर्व पद्धतींचा सराव करते आणि त्या गोष्टी तिला सर्रास जमतातदेखील याचे अनेकांनी कौतुक केले आहे. अभिनेत्री काजू भाजण्यासाठी सेटअपही स्वतः तयार करते. Video मध्ये आपण पाहू शकता की अभिनेत्रीने तीन चिरांच्या दगडांची चूल बनवली असून त्यावर मोठा पत्रा ठेवला आहे. त्यावर काजूचे कच्चे गर टाकून ती चूल आणि त्या चुलीसकट तो पत्रा अगदी संपूर्ण जाळून टाकल्या आहे. त्या जळत्या आगीतून निखाऱ्यांसह काजूची गरंही अगदी योग्यरीत्या तिने बाहेर काढले आहेत आणि काजूच्या बियांचा तिने मनमुराद आस्वाद घेतला आहे.
पोस्टखाली अभिनेत्रीने “काजू भाजण्याचा अनुभव कोणाला घ्यायचा आहे???” असा मिश्किल कॅप्शन दिला आहे.
काय म्हणतायत चाहते?
वैष्णवीचे चाहते वैष्णवीला काजू भाजताना पाहून खुश झाले आहेत. अनेकांनी तिला शाबासकी दिली आहे तसेच कौतुकाची थाप तिच्या पाठीवर दिली आहे.
अभिनेत्री देवमाणुस 2 मालिकेत झळकली होती. वैष्णवी कल्याणकर ही मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘देवमाणूस २’ व्यतिरिक्त तिने झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ आणि सन मराठीवरील ‘टिकली’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती लवकरच मराठी चित्रपट ‘घबडकुंड’ मध्येही झळकणार आहे.






