फोटो सौजन्य - Social Media
‘सुना येती घरा’ या मालिकेत शिरोळे-पाटील आणि शिवनाथच्या कुटुंबांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. दोन्ही कुटुंबामध्ये असणारे वाद या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अशामध्ये दीपाने उमावतीची भूमिका साकारली आहे आणि अभिनेता अशोक शिंदे शिवनाथच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर मालिकेतील नकारात्मक पात्र पदमावती शिरोळे-पाटील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने साकारले आहे.
‘या’ तरुण अभिनेत्री गाजवतील का मालिका?
तरुणांचे श्वास रोखण्यासाठी मालिकेत अनेक तरुण अभिनेत्री झळकणार आहेत. मराठी अभिनेत्री मयुरी आव्हाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नव्या अंदाजात येणार आहे. स्टार प्रवाहवरील आगामी ‘सुना येती घरा’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मयुरीने याआधीही प्रेक्षकांची मनं जिंकली असून, आता ती पुन्हा एकदा नव्या मालिकेतून घराघरांत पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘सुना येती घरा’ या मालिकेची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मयुरीची भूमिका नेमकी कशी असणार, याबाबत सर्वांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. मालिकेची कथा, कलाकार आणि वेगळा विषय यामुळे सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता ही मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरी उतरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘सुना येती घरा’ या मालिकेत अभिनेत्री वैष्णवी शिंदेही झळकणार आहे. तसेच तिचे पात्र अद्याप जाहीर नसून अभिनेत्री ऋषिका कदम या मालिकेत ‘शिरोळे-पाटील’ कुटुंबाच्या थोरल्या सुनेचे पात्र साकारणार आहे. तरुण अभिनेत्रींच्या या कास्टिंगमुळे तरुणांची नजर काय TV वरून हलणार नाही हे नक्कीच!






