Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medha Manjrekar : “कॅन्सरपेक्षा जास्त कठीण..” आजारांशी लढताना मेधा मांजरेकरांनी काय सहन केलं सगळं सांगितलं

Medha Manjrekar : : एका मुलाखतीत मेधा मांजरेकर यांनी आपल्या आरोग्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू असल्याचे सांगताना त्यांनी या संपूर्ण प्रवासाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्याचे सांगितले

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 18, 2026 | 04:08 PM
Medha Manjrekar Reaction On Cancer (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Medha Manjrekar Reaction On Cancer (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने अनेक चाहत्यांना धक्का बसला. त्यांनी स्वतःला कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती दिली आणि उपचारांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचेही सांगितले. मात्र या पोस्टमागचा उद्देश सहानुभूती मिळवणे नसून, कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानणे हा होता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Medha Manjrekar Reaction On Cancer)

एका मुलाखतीत मेधा मांजरेकर यांनी आपल्या आरोग्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू असल्याचे सांगताना त्यांनी या संपूर्ण प्रवासाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्याचे सांगितले. कॅन्सरचे नाव ऐकून अनेकजण घाबरतात, पण स्वतःला हा आजार असल्याचे समजल्यानंतर त्यांनी शांतपणे पुढचा विचार केला. “आता जे शक्य आहे ते सर्वोत्तम करायचे,” हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला.

मेधा मांजरेकरांनी आपल्या आजाराबद्दल सगळं सांगितलं..

मेधा यांच्या मते, वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आज कॅन्सरवरील उपचार पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी झाले आहेत. उपचारांमध्ये काही त्रास होतोच, पण योग्य डॉक्टर, आधुनिक औषधे आणि वेळेवर उपचार मिळाले तर या आजारावर मात करता येते, असा त्यांचा विश्वास आहे. त्या म्हणाल्या की, सुरुवातीला काही तपासण्या करण्याची वेळ आली होती. मात्र त्याच काळात त्यांनी आधीच एक प्रवासाचे नियोजन केले होते. त्यांनी तो प्रवास पूर्ण केला आणि त्यानंतर सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. पुढील तपासण्यांनंतर आजाराचे निदान स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी ही माहिती आपल्या पती महेश मांजरेकर यांना सांगितली.

Sonam Wangchuk : ‘लोकशाहीचा मृत्यू!’ ऋतुजा बागवेनेही धरली मागणी; सोनम वांगचुक यांना जाहीर केला पाठिंबा

आजारावेळेस महेश मांजरेकरांनी दिलेली साथ..

महेश मांजरेकर यांनी यावेळी त्यांना मोठा मानसिक आधार दिला. स्वतःही गंभीर आजाराचा सामना करून बरे झाल्यामुळे त्यांनी पत्नीला धीर दिला. मेधा यांच्याही मनात याच विश्वासाने उपचार सुरू ठेवण्याची ताकद निर्माण झाली. त्यांच्या मते, कुटुंबातील सकारात्मक वातावरण हे कोणत्याही औषधाइतकेच महत्त्वाचे असते. मेधा यांनी आपल्या आजारामागील कारणाबद्दलही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात यापूर्वीही कॅन्सरची प्रकरणे झाली होती. त्यामुळे हा आजार आनुवंशिक कारणांमुळे झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या जीवनशैलीत फारशी निष्काळजीपणा नव्हता. साधा आहार, नियमित दिनक्रम आणि आरोग्याची काळजी घेऊनही काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.

शारीरिक त्रास होत असला तरी प्रेम करणारी माणसंसोबत असतील तर..

या संपूर्ण प्रवासात त्यांना कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या व्यक्तींचा मोठा आधार मिळाला. उपचारादरम्यान शारीरिक त्रास होत असला तरी प्रेम करणारी माणसंसोबत असतील तर प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते, असे त्यांनी सांगितले. कॅन्सरबाबत समाजात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, या आजाराचे नाव ऐकताच अनेकजण मानसिकदृष्ट्या खचून जातात. पण योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू झाले तर परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे भीती न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपचारांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

India’s Got Latent 2 : ‘माझ्या नवऱ्याला दारू पाजून…’ समय रैनाच्या कार्यक्रमात नवऱ्याबाबतच्या वक्तव्याने उडाली खळबळ

मेधा मांजरेकर यांनी शेवटी सर्वांना एक सकारात्मक संदेश दिला. जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण त्यांना स्वीकारून धैर्याने पुढे जाणे हेच महत्त्वाचे असते. कठीण काळ कायम राहत नाही, पण त्यातून बाहेर पडण्याची जिद्द माणसाला अधिक मजबूत बनवते. त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Medha manjrekar first reaction on cancer treatment social media post mahesh manjrekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainment marathi
  • Marathi News

संबंधित बातम्या

तुम्हीही Muthoot Finance कडून घेतलंय गोल्ड लोन? RBI कडून बँकेवर कडक कारवाई, ग्राहकांवर काय होणार परिणाम?
1

तुम्हीही Muthoot Finance कडून घेतलंय गोल्ड लोन? RBI कडून बँकेवर कडक कारवाई, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

Currency Printing Cost: कागदी नोटा बंद होणार? प्लास्टिक नोटा छापण्यासाठी सरकारला मोजावे लागणार जास्त पैसे; नेमका प्लॅन काय?
2

Currency Printing Cost: कागदी नोटा बंद होणार? प्लास्टिक नोटा छापण्यासाठी सरकारला मोजावे लागणार जास्त पैसे; नेमका प्लॅन काय?

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
3

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च
4

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.