Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie: बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’? टॉप A-Rated ओपनर्समध्ये होणार एंट्री

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद असून पहिल्या दिवशी १८-२२ कोटींच्या कमाईचा अंदाज आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 03, 2026 | 10:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mirzapur The Movie: इंडियन सिनेमातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘मिर्झापूर: द मूव्ही’ आता मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन MGM स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या रिलीजला आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजची आयकॉनिक दुनिया पहिल्यांदाच थिएटरमध्ये पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद आणि सोशल मीडियावर निर्माण झालेलं वातावरण पाहता, ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या ओपनिंगकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

‘मिर्झापूर’च्या चाहतावर्गाचा मिळणार फायदा

‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज गेल्या काही वर्षांत देशातील सर्वाधिक लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक ठरली आहे. कालीन भैया, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैया यांसारख्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या लोकप्रिय फ्रँचायझीचा थिएट्रिकल ट्रान्झिशन चित्रपटासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

विशेषतः दिव्येंदूचा मुन्ना भैया पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मुन्ना भैय्याच्या व्यक्तिरेखेचा स्वतंत्र चाहतावर्ग असून, त्याच्या पुनरागमनाचा फायदा चित्रपटाच्या ओपनिंगला मिळू शकतो.

अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद

चित्रपटाबद्दल आधीपासूनच मोठा बझ असल्याने त्याचा परिणाम अॅडव्हान्स बुकिंगवरही दिसून येत आहे. प्रेक्षकांमध्ये ‘मिर्झापूर: द मूव्ही’ मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे. फ्रँचायझीच्या लोकप्रियतेसोबतच चित्रपटाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

याशिवाय, या शुक्रवारी कोणताही मोठा हिंदी चित्रपट रिलीज होत नसल्याने ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला याचा थेट फायदा मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटाला देशभरात मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स मिळू शकतात. तसेच, जन्माष्टमीची सुट्टी ओपनिंग कलेक्शन वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

पहिल्या दिवशी किती कमाई करणार?

बॉक्स ऑफिसवरील अंदाजानुसार, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ पहिल्या दिवशी सुमारे १८ ते २२ कोटी रुपयांची नेट कमाई करू शकतो. जर चित्रपटाने या रेंजमध्ये ओपनिंग केली, तर तो बॉलिवूडमधील टॉप A-रेटेड ओपनर्सच्या यादीत स्थान मिळवू शकतो.

चित्रपटाने अंदाजाच्या वरच्या स्तरावर म्हणजेच जवळपास २२ कोटी रुपयांची ओपनिंग केली, तर A-रेटेड चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनच्या यादीत तो चौथ्या क्रमांकापर्यंत झेप घेऊ शकतो. त्यामुळे आता प्रत्यक्ष रिलीजच्या दिवशी चित्रपट किती कमाई करतो, याकडे बॉक्स ऑफिसचं लक्ष लागलं आहे.

गुरमीत सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला चित्रपट

‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केलं आहे, तर चित्रपटाची कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सहनिर्माते आहेत.

अमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या बहुचर्चित फ्रँचायझीचा मोठ्या पडद्यावरील प्रवास बॉक्स ऑफिसवर किती मोठा ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित

Web Title: Mirzapur the movie box office opening day collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट
1

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय
2

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट
3

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा
4

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.