Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Mixxi Studios: मुंबईत ‘मिक्सी स्टुडिओज’चे भव्य उद्घाटन; AI-आधारित क्रिएटर ॲपने डिजिटल मनोरंजनाला नवी दिशा

मुंबईतील अंधेरी येथे भारतातील पहिल्या AI-आधारित 'मिक्सी' क्रिएटर ॲपच्या अत्याधुनिक व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओचे उद्घाटन प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. 'मिक्सी रायझिंग' स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली असून, AI च्या माध्यमातून क्रिएटर्सना संगीत, व्हिडिओ आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नवी संधी उपलब्ध होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2026 | 03:10 PM
मुंबईत 'मिक्सी स्टुडिओज'चे भव्य उद्घाटन; AI-आधारित क्रिएटर ॲपने डिजिटल मनोरंजनाला नवी दिशा

मुंबईत 'मिक्सी स्टुडिओज'चे भव्य उद्घाटन; AI-आधारित क्रिएटर ॲपने डिजिटल मनोरंजनाला नवी दिशा

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत ‘मिक्सी स्टुडिओज’चे भव्य उद्घाटन
  • AI-आधारित क्रिएटर ॲपने डिजिटल मनोरंजनाला नवी दिशा
  • AI च्या मदतीने काही मिनिटांत व्हिडिओ निर्मिती
 

Mumbai Mixxi Studios News Marathi : मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) येथे भारतातील पहिल्या ‘मिक्सी’ (Mixxi) या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित क्रिएटर ॲपच्या अत्याधुनिक व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओचे भव्य उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते फित कापून या स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. वेळी मिक्सी स्टुडिओजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय मधोक, सह-संस्थापक अर्जुन मधोक, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका व पंडित जसराज फाउंडेशनच्या सह-संस्थापक विदुषी दुर्गा जसराज, स्टुडिओ हेड व व्हर्च्युअल प्रॉडक्शन सुपरवायझर शेरिन वर्गीस तसेच शो रनर-दिग्दर्शक सुपवित्र बाबुल उपस्थित होते.

AI च्या मदतीने काही मिनिटांत व्हिडिओ निर्मिती

‘मिक्सी’ हे AI-फर्स्ट मोबाईल ॲप असून, कोणताही सामान्य वापरकर्ता आपल्या कल्पनेला काही मिनिटांत आकर्षक व्हिडिओच्या स्वरूपात साकार करू शकतो. यासाठी वापरकर्त्याला ॲपमध्ये लॉग-इन करून गाणे, स्टाईल, कोरिओग्राफी आणि व्हर्च्युअल जगाची निवड करावी लागते. त्यानंतर AI तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याच्या मोबाईलवरच एक व्यावसायिक दर्जाचा व्हिडिओ तयार होतो. सध्या या ॲपची सुरुवात संगीत व्हिडिओंपासून करण्यात आली असली, तरी भविष्यात चित्रपटांतील दृश्ये, लघुकथा आणि इतर डिजिटल कंटेंट तयार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

The India Story Trailer : ‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित! कीटकनाशक शेतीमागील काळं सत्य; काजल अग्रवालसोबत मराठमोळा अभिनेता

‘मिक्सी रायझिंग’ स्पर्धेची घोषणा

या ॲपला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिक्सी रायझिंग’ या पाच आठवड्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली. देशभरातील क्रिएटर्स या ॲपच्या माध्यमातून स्वतःचे व्हिडिओ तयार करून दररोज रोख बक्षिसांसाठी स्पर्धा करतील. स्पर्धेचे भाग आठवड्यातून दोन वेळा ॲपवर स्ट्रीम केले जाणार असून, प्रेक्षक आपल्या आवडत्या क्रिएटरला मतदान करून विजेता ठरवण्यात सहभाग घेऊ शकतील. प्रत्येक आठवड्याचा विजेता ऑगस्टअखेर मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत सहभागी होईल. या अंतिम सोहळ्यात विजेत्यांना रेड कार्पेटवर चालण्याची आणि बॉलिवूड कलाकार, इन्फ्लुएन्सर्स व नामवंत क्रिएटर्ससमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

‘AI आणि कलेचा अनोखा संगम’

उद्घाटनानंतर स्टुडिओची पाहणी करताना प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी ‘मिक्सी’ ही अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पना असल्याचे सांगितले. त्यांनी संस्थापक अजय मधोक यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत, अमेरिकेतील त्यांच्या तांत्रिक अनुभवाचा भारतातील AI परिसंस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘मुंबईच आमची पहिली पसंती’

मिक्सी स्टुडिओजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय मधोक यांनी सांगितले की, त्यांच्या मूळ कंपनी ‘सेलेरिटी स्टुडिओज’ने विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्मसाठी भारत ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यांच्या मते, “मुंबई ही संगीत, सर्जनशीलता आणि प्रेक्षकांचे केंद्र आहे. त्यामुळे आमचा AI प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक व्हर्च्युअल स्टुडिओ सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला.” AI तंत्रज्ञान, व्हर्च्युअल प्रॉडक्शन आणि क्रिएटर इकॉनॉमीचा संगम घडवणारा ‘मिक्सी’ प्लॅटफॉर्म भारतीय डिजिटल मनोरंजन उद्योगाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Paresh Rawal : “अमिताभ बच्चन यांनी आता…” अभिनेत्यांबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

Web Title: Mixxi studios virtual production studio launch mumbai ai creator app brijesh singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • ai
  • app
  • Mumbai

संबंधित बातम्या

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
1

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

OPPO चा नवा धमाका! ColorOS 17 ग्लोबली लॉन्च, AI फीचर्सवर खास भर
3

OPPO चा नवा धमाका! ColorOS 17 ग्लोबली लॉन्च, AI फीचर्सवर खास भर

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
4

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.