‘तू फक्त हो म्हण’ (Tu Fakt Ho Mhan) या चित्रपटातून मोनालिसा बागल (Monalisa Bagal) आणि निखिल वैरागर (Nikhil Wairagar) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचा दिमाखदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी मोनालिसा आणि निखिल म्हणाले की, एक उत्तम चित्रपट करायला मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. यातील कथा व गाणी प्रत्येकाच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव म्हणाले की, ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली प्रेमकथा आम्ही प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. आमच्या या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील. येत्या १४ ऑक्टोबरला ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
[read_also content=”गौरीसाठी जयदीपचं कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं https://www.navarashtra.com/latest-news/jaydeep-praying-to-ambabai-to-save-gauris-life-in-sukh-mhanje-nakki-kay-aste-serial-nrsr-330788.html”]
प्रेमासाठी त्याग, संघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या या प्रेमवीरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेत? हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणार? यासोबत प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मीती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ.गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
मोनालिसा बागल, निखिल वैरागर या जोडीसोबतच ‘नाळ’ व ‘झुंड’ चित्रपटानंतर गणेश देशमुख हे एका वेगळया भूमिकेत ‘तू फक्त हो म्हण’ मध्ये दिसणार आहेत. सोबत माजी आमदार तुकाराम बीडकर, सविता हांडे, पुष्पा चौधरी, डॉ.गणेशकुमार पाटील, जोया खान, आकाश ठाकरे, रविशंकर शर्मा, भाविका निकम, राम पारस्कर, योगिनी सोळंके, परमेश्वर गुट्टे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहेत. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीते लिहिली आहेत. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. दिग्दर्शनाची बाजू सांभाळतानाच भास्कर डाबेराव यांनी सुमधूर संगीत चित्रपटाच्या गीतांना दिले आहे. आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते रविशंकर शर्मा व राहुल चव्हाण हे आहेत.






