विराट कोहली आणि ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
India A vs South Africa A : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. पंत खूप काळानंतर पुन्हा मैदानात परतला आहे. मैदानात परतल्यानंतर पंतने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे आता चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ऋषभ पंत आता विराट कोहलीची १८ क्रमांकाची सिग्नेचर जर्सी घालून खेळताना दिसून आला आहे. इंडिया अ जर्सी क्रमांकाची १८ क्रमांकाची जर्सी घातलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल देखील होत आहेत.
विराट कोहलीने आयपीएल २०२५ दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती. कोहलीची १८ क्रमांकाची जर्सी ही त्याच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग बनली आहे. ती त्याच्या नावाचे आणि ओळखीचे प्रतीक बनली असून त्या जर्सी नंबरवर चाहत्यांचे खूप प्रेम आहे. मात्र, आता निवृत्तीनंतर काही महिन्यांनीच, ऋषभ पंतने त्याच जर्सी क्रमांकाची जर्सी घालून मैदानावर उतरून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे.
Rishabh Pant is back – and so are the stump mic moments! 🎯#INDAvSAA, 1st Unofficial Test, LIVE NOW 👉 https://t.co/JjpHHM4t7l pic.twitter.com/8fPyEcNayq — Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025
बंगळुरूमध्ये खेळल्या जात असलेल्या भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील चार दिवसांच्या कसोटी सामन्यात पंत खेळत आहे. त्याने त्याची जुनी १७ नंबरची जर्सी घातली नव्हती. यावेळी त्याने कोहलीची १८ नंबरची जर्सी घातल्याचे दिसत आहे . या बदलामुळे चाहते आश्चर्यचकित झाल्याचे दिसले. कारण पंत नेहमीच मैदानात त्याचा १७ नंबरचा जर्सी घालत असे. असे मानले जाते की तो आता भारतासाठी तीच जर्सी नंबर घालू शकतो.
ऋषभ पंतसाठी देखील हा सामना महत्वाचा होता. कारण तो जवळजवळ तीन महिन्यांनी क्रिकेट मैदानावर परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्न करताना चेंडू त्याच्या पायाला लागला होत, ज्यामुळे त्याला सामन्याबाहेर जावे लागले होते. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शेवटची कसोटी मात्र त्याला खेळता आली नाही.
जवळजवळ तीन महिन्यांनंतर, ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतला आहे. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २३ जुलै २०२५ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने ५४ धावा केल्या होत्या.






