फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही दारूच्या आहारी गेला आहात तर स्वतःला थांबवणेच योग्य आहे. दारूचा अतिरेक तुमच्या जीवनावर धोका आणू शकतो. तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न तयार करू शकतो. तुम्हाला दारिद्र्येच्या रेखेखालीदेखील आणू शकतो. पण जर तुम्ही जास्तीत जास्त एका महिन्यासाठी तरी दारू सोडून दिली. तरी आयुष्यात फार मोठा बदल दिसून येईल.
एका महिन्यासाठी दारू सोडून देण्याचा फायदा?
दारू पिल्याने लिव्हरला फार मोठा त्रास होतो. पण दारू पिणे केवळ एका महिन्यासाठी तरी सोडले तरी लिव्हरमध्ये फार मोठा बदल झालेला दिसून येईल. आपल्या शरीरातून टॉक्सिन काढणारा लिव्हर पुन्हा रुळावर येईल आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्येपासून स्वतःचा बचाव कराल. जर तुमचे वाढते वजन आहे तर दारू तुम्हाला नरकात ढकलणारी आहे. कारण दारू पिताना आपण अनेक तळलेल्या गोष्टी खातो. हे मसालेदार गोष्टी आपले वजन वाढवतात.
दारू सोडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. सतत दारू पिणाऱ्या व्यक्तींना फूड पाइप, तोंड, घसा आणि स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. दारूमधील हानिकारक रसायनं शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती दारूचे सेवन पूर्णपणे थांबवते, तेव्हा शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि शरीर हळूहळू स्वतःला शुद्ध करायला लागते. यामुळे कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांपासून बचाव होतो. दारू सोडल्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारते. अनेकांचा समज असतो की दारू प्यायल्याने पटकन झोप लागते, पण प्रत्यक्षात ती झोप तुटक आणि अस्वस्थ असते. रात्री वारंवार जाग येणे, सकाळी डोकेदुखी आणि थकवा जाणवणे. ही सगळी लक्षणं दारूमुळे निर्माण होतात. दारू सोडल्यानंतर शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र पुन्हा व्यवस्थित चालू होते, त्यामुळे झोप गाढ, शांत आणि ताजेतवाने करणारी होते.
म्हणूनच, जर तुम्हाला स्वतःचे आरोग्य जपायचे असेल आणि मानसिक शांतीसह निरोगी जीवन जगायचे असेल, तर दारू सोडणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात योग्य आणि आरोग्यदायी निर्णय ठरू शकतो.






