Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट

The India Story Review: श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांच्या 'द इंडिया स्टोरी' चित्रपटाचा रिव्ह्यू. कीटकनाशकांच्या घातक परिणामांवर भाष्य करणारा चित्रपट दमदार विषय असूनही कमकुवत पटकथेमुळे प्रभाव पाडण्यात कमी पडतो.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 24, 2026 | 02:44 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेता श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट एका अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करतो. शेतीमध्ये कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम या विषयाला चित्रपटाने हात घातला आहे. विषय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा असला, तरी कमकुवत पटकथा आणि प्रभावी मांडणीचा अभाव यामुळे चित्रपट अपेक्षित उंची गाठू शकत नाही.

चित्रपटाची कथा माजी लष्करी अधिकारी मेजर योगेश पाटील (श्रेयस तळपदे) यांच्याभोवती फिरते. त्यांच्या सात वर्षांच्या मुली परी (त्रिशा शारदा) हिला रक्ताचा कर्करोग झाल्याचं निदान होतं. उपचारासाठी सर्वस्व पणाला लावूनही योगेश आपल्या मुलीला वाचवू शकत नाही. पुढे त्याला समजतं की अन्नातील घातक कीटकनाशकांमुळेच तिचा कर्करोग झाला होता. त्यानंतर तो सरकार, कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रसायनांचा अतिवापर करणाऱ्या व्यवस्थेविरोधात न्यायालयीन लढा उभा करतो.

या लढ्यात त्याची साथ देते वकील अर्चना (काजल अग्रवाल). न्यायालयात ती कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे देशात वाढणाऱ्या कर्करोगाच्या घटनांकडे लक्ष वेधते. योगेश आणि अर्चना यांची ही न्यायासाठीची लढाई शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करते.

लेखक सागर बी. शिंदे यांनी सत्य घटनांपासून प्रेरणा घेत कथा लिहिली आहे. पंजाबमधील प्रसिद्ध ‘कॅन्सर ट्रेन’, केरळमधील कर्करोगाचे हॉटस्पॉट, फळे-भाज्यांवर होणारी रासायनिक फवारणी आणि भेसळयुक्त दूध यांसारख्या वास्तव समस्यांवर चित्रपट प्रकाश टाकतो. त्यामुळे चित्रपटाचा आशय निश्चितच प्रभावी आणि समकालीन वाटतो.

Jana Nayagan Box Office Collection: विजयच्या ‘जन नायकन’ची दणदणीत सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

मात्र, दिग्दर्शक चेतन डीके या गंभीर विषयाला प्रभावी सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित करण्यात कमी पडतात. चित्रपटाची पटकथा न्यायालयीन नाट्य आणि भावनिक प्रसंगांमध्ये सतत हेलकावे खाते. त्यामुळे कथानकाचा प्रवाह विस्कळीत वाटतो. पूर्वार्ध काहीसा माहितीपटासारखा भासतो, तर न्यायालयीन संघर्षात आवश्यक ती धार आणि थरार जाणवत नाही. विरोधी बाजूचा युक्तिवादही पुरेशा ताकदीने मांडला जात नसल्याने संघर्ष एकतर्फी वाटतो.

अभिनयाच्या बाबतीत श्रेयस तळपदे ने दुःख, संताप आणि संघर्ष यांचा समतोल साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काजल अग्रवालची भूमिका संयमी असून तीनेही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. बालकलाकार त्रिशा शारदा हिचाही अभिनय प्रभावी ठरतो.

Kissing Controversy: किसिंग वादानंतर अभिजीत भट्टाचार्यांनी उदित नारायण यांना दिला होता खास सल्ला; वर्षभरानंतर केला मोठा खुलासा

Web Title: The india story review shreyas talpade kajal aggarwals social drama has a strong message but a weak screenplay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
1

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
3

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
4

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.