( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Nana Patekar Death: चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्या अचानक झालेल्या निधनावर चाहत्यांनाही विश्वास बसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले त्या नंतर त्यांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण काही वेळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नाना पाटेकर केवळ त्यांच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर भारतीय लष्कराशी असलेल्या त्यांच्या विशेष संबंधांसाठीही ओळखले जात होते. लष्कराशी असलेले त्यांचे संबंध केवळ चित्रपटांपुरते मर्यादित नव्हते. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान, नाना पाटेकर यांनी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत सुमारे ६० दिवस घालवले होते.
असे म्हटले जाते की नाना पाटेकरांचा प्रहार चित्रपटापासून भारतीय लष्कराशी संबंध सुरू झाला. या चित्रपटाच्या तयारीसाठी त्यांनी बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले होते. हे प्रशिक्षण कारगिल युद्धादरम्यान उपयोगी पडले. नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, कारगिल युद्धादरम्यान त्यांनी लष्करात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
1999 च्या कारगिल युद्धादरम्यान, नाना पाटेकर यांनी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे सैन्यात सामील होण्यासाठी परवानगी मागितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांना सांगण्यात आले होते की, एक सामान्य नागरिक थेट सैन्यात भरती होऊ शकत नाही. त्यानंतर, नानांनी त्यांना त्यांच्या कमांडो प्रशिक्षणाबद्दल आणि नेमबाजीबद्दल समजावून सांगितले. त्यांनी हेही सांगितले की, त्यांनी राष्ट्रीय स्तरावर रायफल नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकले होते.






