झी मराठीवर (Zee Marathi) प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘हे तर काहीच नाय’ (He Tar Kahich Nay) हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकारांनी सादर केलेले किस्से प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस पडत आहेत. प्रत्येक आठवड्यात कलाकार या मंचावर येऊन भन्नाट किस्से सांगून प्रेक्षकांना हसवत आहे.
बिलाचं पुढे झालं काय ?
शुक्र – शनि, रात्री ९:३० वा. #HeTarKahichNay #ZeeMarathi
आता तुमचे आवडते कार्यक्रम कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/2H1wcRBhbL — Zee Marathi (@zeemarathi) January 6, 2022
आगामी भागात अभिनेत्री प्रेमा किरण सहभागी होणार असून, त्या गोल्डन जुबली ‘दे दणादण’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से सांगणार आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या यांच्याशी निगडित कुठलीही आठवण प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवते. त्यावेळी ‘पोलीसवाल्या सायकल वाल्या…’ या गाण्याचं शूटिंग करताना काय धमाल झाली हे प्रेमा किरण ‘हे तर काहीच नाय’च्या मंचावर सगळ्यांना सांगणार आहेत.
[read_also content=”आर्थिक कटकटींमुळे त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न, खाकी वर्दीतील देवदूतामुळे वाचला तरुणाचा जीव https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/thane/police-saved-young-mans-life-in-khadakpada-area-of-kalyan-nrsr-218981/”]
याशिवाय आपल्या जीवनातील काही मूल्यवान आठवणींनाही त्या उजाळा देणार आहेत. ज्या ज्या कलाकारांनी लक्ष्यासोबत काम केलं ते आजही त्याच्या प्रेमात दिसतात. हीच लक्ष्याची खरी कमाई मानली जात आहे. रसिकांचं मनोरंजन करता करता त्यानं कमावलेलं मनुष्यधन समाजात पेरलं गेल्याचीच अनुभूती या आठवणींच्या निमित्तानं सर्वांना येणार आहे.