उपवासाच्या दिवशी खिचडी खाऊन कंटाळा आल्यास १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट रताळ्याची रबडी
उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात साबुदाणा खिचडी बनवून खाल्ली जाते. प्रत्येक घरात साबुदाण्याची खिचडी कायमच बनवली जाते. पण उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. ऍसिडिटी, अपचन आणि गॅसची समस्या उद्भवते. त्यामुळे उपवास केल्यानंतर साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी रताळ्याचा वापर करून बनवलेले पदार्थ खावेत. रताळ्याची चव गोडसर असते. त्यामुळे मधुमेह असलेले रुग्णसुद्धा रताळ्याचे सेवन करू शकतात. आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी रताळ्याची रबडी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. रताळ्यांमध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी रताळ्याचे सेवन करावे. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली रताळी खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. रताळ्यांमध्ये असलेले एंटीऑक्सिडेंट्स त्वचा तरुण ठेवण्यासाठी मदत होते. चला तर जाणून घेऊया रताळ्याची रबडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी






