सिल्लोड–सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकी दिल्याच्या आरोपांमुळे आमदार अब्दुल सत्तार अडचणीत सापडले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या सभेत मतदान न करणाऱ्या मतदारांवर “रामबाण उपाय” करण्याची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या कथित वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी सी-विजिल ॲप व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रार फेटाळण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले.