Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं
आकृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, ‘अत्यंत जड अंतःकरणाने मी आज हे सांगत आहे की, मी आणि माझ्या होणाऱ्या पतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यासाठी आमची ध्येये आणि परिस्थिती वेगळी असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांवर कितीही प्रेम करत असलो आणि एकमेकांची कितीही काळजी घेत असलो, तरी आमचे मार्ग वेगवेगळे आहेत आणि हे आम्ही स्वीकारले आहे. आमच्या जबाबदाऱ्या आणि सध्याची परिस्थिती विचार करून, आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.’
आकृतीने पुढे लिहिले की, ‘मी दोघांसाठीही प्रार्थना करते की, आम्हा दोघांनाही भविष्यात चांगल्या गोष्टी, शांतता आणि आनंद मिळो. मी सर्वांना विनंती करते की या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. तसेच, आमच्या या निर्णयामागील कारणांबाबत कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क लावू नयेत किंवा कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत.आमची परिस्थिती समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या प्रयव्हसीचा आदर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.’
View this post on Instagram
बऱ्याच काळाच्या नात्यानंतर, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा यावर्षी ८ मार्च रोजी साखरपुडा झाला. ते खूप आनंदी होते आणि त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत सुंदर फोटो शेअर केले होते. चाहते पृथ्वी शॉच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते, पण साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचा हा प्रवास कधीच प्रत्यक्षात उतरला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात कटुता आल्याच्या बातम्या येत होत्या.१७ सप्टेंबर रोजी त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला.
२६ वर्षीय पृथ्वी शॉला एकेकाळी भारतीय क्रिकेटचा पुढचा स्टार मानले जात होते. २०१८ मध्ये, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि शतक झळकावले. परंतु, नंतर त्याचा फॉर्म घसरला आणि त्याला संघातून वगळण्यात आले. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही आपल्या स्थानासाठी संघर्ष करत आहे.






