Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: परीक्षेनंतर शिक्षकांनी पालकांना सांगण्याचं म्हटलं अन् १४ वर्षीय अनमोल घरातून गायब; जान्हवी किल्लेकरचं भावनिक आवाहन!

शाळेत घडलेल्या एका प्रकारानंतर १४ वर्षीय अनमोल घाबरला अन् ९ सप्टेंबरला अचानक बेपत्ता झाला, अशी माहिती समोर आली आहे. अनेक दिवस उलटूनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून, आता अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने अनमोलचा फोटो शेअर करत त्याच्या शोधासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 03:40 PM
Pune News: परीक्षेनंतर शिक्षकांनी पालकांना सांगण्याचं म्हटलं अन् १४ वर्षीय अनमोल घरातून गायब; जान्हवी किल्लेकरचं भावनिक आवाहन!

Pune News: परीक्षेनंतर शिक्षकांनी पालकांना सांगण्याचं म्हटलं अन् १४ वर्षीय अनमोल घरातून गायब; जान्हवी किल्लेकरचं भावनिक आवाहन!

Follow Us
Follow Us:
  • हडपसरमधून १४ वर्षीय अनमोल ९ सप्टेंबरपासून बेपत्ता
  • अभिनेत्री जान्हवी किल्लेकरकडून सोशल मीडियावर शोधासाठी आवाहन
  • माहिती मिळाल्यास पोलिसांना तातडीने कळवण्याचे आवाहन
पुणे : हडपसर परिसरातून १४ वर्षीय विद्यार्थी अनमोल मोतीलाल विश्वकर्मा हा ९ सप्टेंबर २०२६ पासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवस उलटूनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने अनमोलचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांना त्याच्या शोधासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

९ सप्टेंबरपासून बेपत्ता

अनमोल विश्वकर्मा हा हांडेवाडी रोड, हडपसर येथील सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, शाळेतील परीक्षेदरम्यान तो कॉपी करताना आढळला होता. याबाबत शिक्षकांनी त्याला समज दिली आणि ही बाब पालकांना सांगण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो घाबरला आणि ९ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगा घरी परतला नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचे मित्र, नातेवाईक तसेच परिसरात शोध घेतला. मात्र, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

जान्हवी किल्लेकरचे मदतीचे आवाहन

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने अनमोलचा फोटो शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. मुलगा कुठेही आढळल्यास तातडीने माहिती देण्याची विनंती तिने केली आहे. “आपलं मूल जेव्हा हरवतं, तेव्हा आई-वडिलांना काय मानसिक त्रास होतो, हे फक्त आई-वडीलच समजू शकतात,” असे सांगत अनमोलचा शोध घेण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन तिने केले.

अनमोलची माहिती

नाव : अनमोल मोतीलाल विश्वकर्मा
वय : १४ वर्षे
शाळा : सिग्नेट पब्लिक स्कूल
परिसर : हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे

अनमोलबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Pune hadapsar 14 year old anmol vishwakarma missing janhvi killekar appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Child Missing
  • Hadapsar
  • maharashtra. pune crime
  • Missing Case

संबंधित बातम्या

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण
1

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध
2

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.