
Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Radha Patil Dahi Handi Controversy: महाराष्ट्रात गौतमी पाटील आणि राधा पाटील या दोघींमध्ये कायम स्पर्धा असते. दोघींचीच क्रेझ भारी आहे. यंदाच्या दहिहंडीला पण दोघींनी धमाल केली. पुण्यात तर राधा पाटीलने चांगलीच गर्दी खेचली होती. तिच्या लावणीवर पुणेकर थिरकले मात्र आता त्याच कार्यक्रमावरुन मोठा वाद सुरु झाला आहे.
राधा पाटीलने स्टेजवर अश्लील हावभाव केले असा आरोप तिच्यावर होतो. या प्रकरणात थेट पोलिसांनी तिच्यावर आणि आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राधा पाटीलने पहिल्यांदाच मीडियासमोर येऊन संताप व्यक्त केला आहे. ती म्हणते, साडी नेसल्यावर कंबर दिसणारच, त्यात अश्लील काय आहे?Radha Patil on Pune Dahi Handi Program:
दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर नाचणाऱ्या कलाकारांना रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. हे प्रमाणपत्र नसेल तर कार्यक्रमाला परवानगी मिळत नाही. पुण्यातल्या बिबवेवाडीमध्ये ज्या मंडळाने राधा पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता, त्यांनी हे प्रमाणपत्र दिलं नव्हतं. त्यामुळे मंडळाने त्यांना परवानगी नाकारली होती. परवानगी नाही म्हटल्यावर पण आयोजकांनी कार्यक्रम घेतला.
राधा पाटीलचा डान्स त्यावेळेस गर्दीपण जमा झाली होती. कोणीतरी तिच्या डान्सचा व्हिडिओ काढला आणि त्यात ती अश्लील हावभाव करतेय असा आरोप केला. या आरोपावरूनच बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा राधा पाटीलवर नाही तर मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकांवर पण दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्याची बातमी पसरताच राधा पाटीलने टीव्ही 9 मराठीशी बोलताना सगळा राग काढला.ती म्हणाली, “आम्ही स्टेजवर साडी नेसून नाचतो. साडी नेसल्यावर पोट, कंबर दिसणारच ना. ही तर कॉमन गोष्ट आहे. घरातल्या बायका पण साडी नेसतात, त्यांची पण कंबर दिसते. मग त्यात अश्लीलता कुठे आली? मी आजपर्यंत कधीच अश्लील हावभाव करून नाचले नाही. जर मी अश्लील नाचले असेल तर त्याचा व्हिडिओ दाखवा.”
ती म्हणाली, “माझं आडनाव पाटील आहे म्हणून मला टार्गेट करताय का? एका पाटीलने काहीतरी वाईट केलं असेल म्हणून दुसरी पाटील पण वाईटच असणार असं तुम्हाला वाटतं का? हे चुकीचं आहे. मला माहिती आहे मी कशी नाचते. माझं नक्की काय वाईट आहे ते दाखवून द्या, उगाच बदनाम करू नका.”
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आधी पण असे वाद झाले होते. त्यामुळे आता राधा पाटीलच्या नावाने पण वाद सुरू झाला की लोक जास्त लक्ष देतात. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही लोक तिला सपोर्ट करत आहेत तर काही लोक तिच्यावर टीका करत आहेत.पण राधाचा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे.
दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा …
लावणी किंवा लोकनृत्य सादर करताना साडी नेसली जाते आणि त्यात कंबर दिसणं हे नैसर्गिक आहे. त्याला अश्लील म्हणणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न आता सगळेच विचारत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पुढे तपास काय होतो हे बघावं लागेल. पण या सगळ्या प्रकारामुळे राधा पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, हे मात्र नक्की.