Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ऑडिशन दिली नेगेटिव्ह भूमिकेसाठी पण निवड झाली ‘आसावरी’साठी, जुई गोगरीचा ‘सनई चौघडे’चा अद्भुत प्रवास

‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेत्री जुई गोगरी ‘आसावरी परब’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.ती एकदम साधी सरळ कुटुंबाला जपणारी भूमिका साकारतेय. जुईने मनमोकळ्या गप्पा मारत कशी निवड झाली ते सांगितले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 18, 2026 | 12:42 PM
कशी आहे 'सनई चौघडे' मधील आसावरी

कशी आहे 'सनई चौघडे' मधील आसावरी

Follow Us
Close
Follow Us:

मालिकांमध्ये खरं तर एखाद्या भूमिकेत चपखल बसणं म्हणजे ती भूमिका लेखक जशी लिहितो तशी पडद्यावर साकारणं. आपण जसे आहोत त्यापेक्षा वेगळं पडद्यावर दिसावं लागतं आणि काही कलाकार एखादी भूमिका अशी साकारतात की ही भूमिका फक्त त्यांना पाहूनच लिहीली असावी आणि अशीच भूमिका सध्या साकारतेय ती म्हणजे जुई गोगरी. काही दिवसातच ‘सनई चौघडे’ या मालिकेतील तिची आसावरी परब ही भूमिका प्रेक्षकांंच्या मनात जागा करून गेली आहे. पण तिच्याशी जेव्हा प्रत्यक्षात बोलतो तेव्हा स्क्रिनवर दिसणारी ही साधी आणि सरळ मुलगी खरं तर खूपच मस्तीखोर आणि Bubbly आहे हे लक्षात येतं. जुईने ‘नवराष्ट्र’सह अगदी मनमोकळेपणाने आपली या भूमिकेसाठी कशी निवड झाली याबाबत भरभरून गप्पा मारल्या आहेत. 

‘सनई चौघडे’ मालिकेतील ही भूमिका स्वीकारताना तू काय विचार केला होतास? असा प्रश्न विचारल्यास जुई म्हणाली, ‘माझ्या सिलेक्शनबाबत खरं सांगू का अगदी अर्ध्या तासात मला ऑडिशननंतर कॉल आला होता आणि माझा तर विश्वासच बसत नव्हता. कारण ऑडिशन दिल्यावर बराच वेळ लागतो प्रक्रियेसाठी पण हे सगळं झटपट झालं होतं आणि गंमत म्हणजे मी जेव्हा ऑडिशन द्यायला गेले तेव्हा नेगेटिव्ह पात्रासाठी ऑडिशन दिलं होतं. समायरा या भूमिकेसाठी खरं तर गेले होते आणि निवड झाली ती आसावरीसाठी. आतापर्यंत मी निगेटिव्ह भूमिका केल्या आणि अचानक पॉझिटिव्ह भूमिकेसाठी माझी निवड झाली त्यामुळे मला अधिक आनंद झाला. माझा तर निवड झाल्यावर काही वेळ विश्वासच बसत नव्हता.’ जुईचा आनंद अगदी मुलाखत देतानाही ओसंडून वाहत होता. 

Exclusive: ‘मायबाप प्रेक्षकांचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, साथ लाभावी हीच इच्छा’, – मेघना एरंडे

निवड झाल्यावर तू सर्वात पहिले काय केलंस? तिचा हा उत्साह पाहून जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा जुई म्हणाली की, ‘खरं तर मी काही काळ ना मला काही सुचतच नव्हतं. मी हे नक्की झालंय का याच विचारात अगदी शांत होते आणि नंतर उड्या मारल्या. कारण खऱ्या आयुष्यात मी खूप मस्तीखोर आहे आणि आसावरीसारखं शांत राहणं काही मला जमणार नाही’

आसावरी या भूमिकेसाठी कशी तयारी केलीस? ‘खरं सांगू का? ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हानंच होतं कारण आवाजावर मला खूपच नियंत्रण ठेवावं लागतं. याशिवाय मी माझ्या शारीरिक हालचालींवरही खूप काम करतेय. आसावरी ही डोळ्यांनी बोलणारी मुलगी आहे. ती शब्दात कमी आणि डोळ्यांनी जास्त बोलते यावर मी अधिक अभ्यास करते आहे. याशिवाय खाण्यावरही खूप नियंत्रण ठेवते. घरचंच जेवते, बाहरेचं खात नाही कारण आसावरी नाजूक आहे आणि मला स्क्रिनवर तसंच दिसायचं आहे.’

तुझी आणि गौतमची जोडी खूपच मस्त वाटते तर त्याच्याशी आणि इतर टीमशी तुझा बाँड व्हायला वेळ लागला का? यावर पटकन जुई म्हणाली की, ‘बाँड तयार व्हायला अजिबात वेळ लागला नाही. तर माझा सहकलाकार जो गौतमची भूमिका करतोय त्याच्याबरोबरही पटकन मैत्री जुळली आणि आपोआप मस्त काम सुरू झाले. इथे सगळेच जण एकमेकांची काळजी करतात त्यामुळे बाँड तयार होण्यासाठी वेगळं काही करावं लागलं नाही’

Zee Marathi : सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट; जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री

प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद तुझ्या भूमिकेला मिळतोय आणि तुला काय वाटतंय? यावर जुई उत्साहाने म्हणाली की, ‘मला प्रेक्षकांचाच काय तर अगदी घरच्या मंडळीचा आणि मित्रमैत्रिणींचाही प्रतिसाद खूप मस्त मिळतोय. कमाल वाटतंय आणि इतकी सकारात्मक आणि सटल भूमिका करताना मजा येत आहे. कुठेही कटकारस्थान न करता अगदी मनाला स्पर्शून जाणारी आसावरी सर्वांना आवडत आहे हे बघून मला पण मस्त वाटत आहे. सगळं अगदी छान जुळून आलंय’ सध्या आसावरीच्या भूमिकेत जुई सर्वांनाच आवडत आहे आणि आता तिचं आणि गौतमचं सुत नक्की शर्वरी आणि शायनर कसे जुळवून आणणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. याबाबत जुईदेखील प्रेक्षकांइतकीच उत्सुक दिसून आली आणि त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे हेदेखील सांगायला विसरली नाही. 

Web Title: Sanai choughade fame actress jui gogri shared experience about selection process exclusively

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?
1

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?

Shashank Ketkar : “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!
2

Shashank Ketkar : “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
3

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Nivedita Saraf : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा पहिला प्रोमो; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक
4

Nivedita Saraf : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा पहिला प्रोमो; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.