Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Entertainment News: ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’च्या सेटवरील खास बॉन्डिंग, 10-12 वर्षांची मैत्री पुन्हा व्हायरल

Entertainment News: 'सौभाग्यवती वृंदा मोहन' मालिकेच्या सेटवर कलाकारांमधील केवळ व्यावसायिक नातेच नव्हे, तर जिवाभावाची मैत्रीही पाहायला मिळते. मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारणारा संग्राम समेळ आणि शशांकची भूमिका निभावणारा अशिष जोशी यांची १०-१२ वर्षांची मैत्री आजही तितकीच घट्ट आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 01, 2026 | 10:55 AM
'Saubhagyavati Vrinda Mohan' Marathi Serial Set- (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

'Saubhagyavati Vrinda Mohan' Marathi Serial Set- (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • संग्राम समेळ आणि अशिष जोशी यांची १०-१२ वर्षांची जुनी मैत्री
  • ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’च्या सेटवर अधिक खुलून
  • पडद्यावरील नैसर्गिक केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन बॉन्डिंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून
  • व्हायरल रिल्स आणि मजेशीर क्षणांमुळे या दोन्ही कलाकारांची मैत्री सोशल मीडियावरही चर्चेत
‘Saubhagyavati Vrinda Mohan’ Marathi Serial Set: मराठी मालिकांच्या दुनियेतील अनेक कलाकार एकत्र काम करत असतात. काही कलाकार ओळखी कामापुरत्याच राहतात, तर काही नाती ही आयुष्यभरासाठी जपली जातात. ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेच्या सेटवरही अशीच एक सुंदर मैत्री पाहायला मिळाली. मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारणारा संग्राम समेळ आणि शशांकच्या भूमिकेत दिसणारा अशिष जोशी हे दोघे आज प्रेक्षकांचे आवडते चेहरे ठरले आहेत. पडद्यावर त्यांची केमिस्ट्री जशी नैसर्गिक वाटते , तशीच यांच्या खऱ्या आयुष्यातील मैत्रीही प्रेक्षकांची मने जिकंणारी आहे.

मैत्री आणखी घट्ट झाली…

या दोघांची मैत्री आजची नाही. अनेक वर्षांपूर्वी ठाण्यात राहत असताना त्यांची ओळख झाली. परिसरात भेटीगाठी, चहाच्या कट्ट्यावरच्या गप्पा आणि छोट्या- मोठ्या भेटींमधून त्याच्यांत विश्वासाचं नातं निर्माण झालं. काळ बदलला, कामं बदलली मात्र त्यांच्यामधलं मैत्रीणीचे नाते तसचं टिकून राहिलं. आता एकाच मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने ही मैत्री आणखी घट्ट झाली आहे.

शूटिंगच्या धावपळीतही दोघे वेळ काढून एकमेकांसोबत धमाल करतात. सेटवरचं वातावरण हलकं-फुलकं ठेवण्यासाठी ते सतत काहीतरी मजेशीर करत असतात. विशेष म्हणजे गाण्यांवर तयार केलेले त्यांचे रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यांच्या सहज अभिनयामुळे आणि नैसर्गिक अंदाजामुळे हे व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. (Entertainment News:)

काम करताना कोणताही ताण जाणवत नाही..

संग्रामच्या मते, आशिषचा स्वभाव हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. तो नेहमी आनंदी, उत्साही आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारा आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना कोणताही ताण जाणवत नाही. रोजच्या शूटिंगमध्ये नवीन कल्पना सुचवणे, गाण्यांची निवड करणे आणि प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी वेगळं करण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो.

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! डॉक्टरांनी दिला ‘इतके’ आठवडे बेडरेस्टचा सल्ला; नेमकं काय घडलं?

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने संग्रामने ‘या’ खास नात्याबद्दल भावना व्यक्त

दोघांच्या आवडी-निवडी अनेक बाबतीत वेगळ्या असल्या तरी त्याच वेगळेपणामुळे त्यांची मैत्री अधिक मजबूत झाली आहे. एकमेकांच्या मतांचा आदर करणं, गरज पडल्यास साथ देणं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं, ही त्यांच्या नात्याची खास ओळख आहे. त्यामुळेच पडद्यामागची त्यांची मैत्री प्रेक्षकांनाही भावते.

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने संग्रामने या खास नात्याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितलं की, आयुष्यात चांगले मित्र मिळणं हे नशीबाचं असतं. मालिकेमुळे त्याला केवळ एक सहकलाकार मिळाला नाही, तर कायम साथ देणारा विश्वासू मित्र मिळाला. भविष्यातही ही मैत्री अशीच कायम राहावी आणि दोघांनी एकत्र आणखी चांगलं काम करावं, अशी त्याची मनापासून इच्छा आहे.

‘सनई चौघडे’मुळे पुन्हा बहरली मेघना एरंडे जोशी-अदिती सारंगधर यांची कॉलेजमधील मैत्री

आजच्या स्पर्धेच्या काळात कलाकारांमध्ये खरी मैत्री टिकून राहणं ही दुर्मिळ गोष्ट मानली जाते. मात्र संग्राम समेळ आणि आशिष जोशी यांनी ही गोष्ट चुकीची ठरवली आहे. त्यांच्या नात्यात दिखावा नाही, तर जिव्हाळा आहे. म्हणूनच त्यांच्या मैत्रीची चर्चा फक्त सेटवरच नाही, तर चाहत्यांमध्येही रंगताना दिसते. पडद्यावरची जोडी आणि पडद्यामागचं मैत्रीचं नातं या दोन्ही गोष्टींमुळे हे दोघे आज प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करत आहेत.

Web Title: Sangram samel and ashish joshis 10 year friendship wins hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
1

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!
2

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
3

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
4

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.