शाहरूखच्या मन्नतमध्ये सापडले २ साप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
किंग खानच्या घरात साप आढळला
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, काल, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता, ‘मन्नत’मध्ये दोन साप दिसल्याची माहिती एका बचाव पथकाला मिळाली. सर्पमित्र विकी दुबे यांना फोन आला की, वांद्रे पश्चिम येथील ‘मन्नत’मध्ये दोन साप दिसले आहेत. फोन येताच, दुबे यांनी तात्काळ वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक दादा गायकवाड आणि मुंबई रेंज ऑफिस, ठाणे यांना त्यांच्या नियंत्रण कक्षामार्फत माहिती दिली आणि मन्नतकडे कूच केले.
८ फूट लांबीचा साप
तपासणीनंतर, तो धामण साप असल्याचे निष्पन्न झाले, ज्याला इंडियन रॅट स्नेक म्हणूनही ओळखले जाते. तो बंगल्यातील जिन्याखाली आढळला आणि अंदाजे ८ फूट लांब होता. दिलासादायक बाब म्हणजे तो विषारी नाही. एका सापाला वाचवण्यात यश आले आहे, तर दुसरा साप अद्याप सापडलेला नाही. रात्री उशिरापर्यंत अथक शोध घेऊनही तो सापडला नाही, असं सांगण्यात आलं आहे. मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात असलेली ‘मन्नत’ ही एक आलिशान मालमत्ता आहे. या घराची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट
कामाच्या आघाडीवर, शाहरुख खान ‘किंग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा Action-थ्रिलर चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सुहाना खान, राघव जुयाल आणि राणी मुखर्जी यांसारखे प्रमुख कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या काही वर्षात शाहरूख खानचे जास्त चित्रपट आलेले नाहीत. मात्र त्याचा मागील चित्रपट सुपरहिट ठरला होता.



