Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सीता के पति…’; जंतर-मंतरवरील कुणाल कामराच्या वक्तव्यावरून नवा वाद, अभिजित दीपकेवरही नेटकऱ्यांचा निशाणा

Kunal Kamra controversy : कुणाल कामराने दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ला (सीजेपी ) च्या आंदोलनाला उपस्थिती लावली. यावेळी त्याने एक वक्तव्य केले जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 11:18 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kunal Kamra controversy: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे झालेल्या कार्यक्रमात कॉमेडियन कुणाल कामराच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू रामांचा संदर्भ देत केलेल्या विधानावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, व्यासपीठावर उपस्थित असलेले अभिजित दीपके (‘कॉकरोच जनता पार्टी’ला (सीजेपी) यालाही टीकेला सामोरे जावे लागत आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि कलाकार जंतर-मंतरवर उपस्थित राहत आहेत. त्याच कार्यक्रमात कुणाल कामराने आपल्या खास शैलीत भाषण केले. भाषणादरम्यान सरकारवर टीका करताना त्याने एक टिप्पणी केली, जी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये कुणाल कामरा म्हणताना दिसतो, “हे सरकार अनेक वर्षांपासून तेच करत आहे. हे लोक फक्त सीतेच्या पतीचं नाव घेतात, पण नीतेच्या पतीची कामं करतात.” या वक्तव्यात त्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत सरकारवर उद्योगपतींना लाभ मिळवून देण्याचा आरोप केला.

मात्र, प्रभू रामांचा उल्लेख करत केलेल्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हे वक्तव्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारं असल्याचा आरोप केला. यामुळे कुणाल कामरावर टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, या वक्तव्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले अभिजित दीपके टाळ्या वाजवताना दिसल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी त्याच्यावरही नाराजी व्यक्त केली असून सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे, काही जण या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय उपरोधाच्या दृष्टीने पाहत असल्याने या वक्तव्यावरून मतमतांतरेही पाहायला मिळत आहेत.

Shehnaaz Gill On Raghav Juyal : राघव जुईयलसोबतच्या नात्यावर शहनाज गिलची पहिली प्रतिक्रिया; डेटिंगच्या चर्चांवर दिलं स्पष्ट उत्तर

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिलं, “भाजप सदस्य सीतेच्या पतीचं नाव घेतात. कुणाल कामराने सीजेपीच्या व्यासपीठावरून केलेलं हे वक्तव्य प्रभू श्रीरामांचा अपमान करणारे आहे. यापूर्वीही ‘जय श्रीराम’ घोषणेवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती,” असा आरोप त्याने केला.

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

तर दुसऱ्या एका युजरने दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी केली. त्याने लिहिलं, “अभिजित दीपके यांनी कुणाल कामराला सीजेपीच्या आंदोलनात आमंत्रित केलं होतं. व्यासपीठावर आल्यानंतर कामराने ‘सीतेचे पती’ असा उल्लेख करत वक्तव्य केलं. त्या वेळी अभिजित दीपके टाळ्या वाजवत आणि हसताना दिसले. कोट्यवधी हिंदू माता सीतेची पूजा करतात. अशा प्रकारचं वक्तव्य इतर धर्मांबाबत करण्याचं धाडस हे लोक दाखवतील का?”

Web Title: Sita ke pati kunal kamras remarks at jantar mantar sparks fresh controversy netizens also target abhijit dipake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Kunal Kamra
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
1

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा
2

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.