(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shehnaaz Gill On Raghav Juyal :अभिनेत्री शहनाज गिल आणि डान्सर-अभिनेता राघव जुयाल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगल्या आहेत. दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले. मात्र, आता शहनाज गिलने पहिल्यांदाच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
तिच्या आगामी ‘इश्कनामा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत शहनाजला राघव जुयालसोबतच्या नात्याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. मात्र, तिने हा प्रश्न अतिशय शांतपणे टाळला. “कृपया मला वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारू नका,” असे म्हणत तिने कोणतेही स्पष्ट उत्तर देणे टाळले.
विशेष म्हणजे, शहनाजने डेटिंगच्या अफवांना ना दुजोरा दिला, ना त्यांचे खंडन केले. त्यामुळे दोघे केवळ चांगले मित्र आहेत की त्यांच्या नात्यात आणखी काही आहे, याबाबतची उत्सुकता कायम आहे.
मुलाखतीत मात्र शहनाजने राघवबद्दलचा आदर आणि आपुलकी व्यक्त केली. तिने त्याच्या आगामी ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटाचा उल्लेख करत चाहत्यांना तो चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.
“माझा एक खूप चांगला मित्र ‘भाई तेरा स्टार है’ हा चित्रपट घेऊन येत आहे. कृपया त्याला पाठिंबा द्या. तो माझा जिवलग मित्र आहे आणि त्याचा हा चित्रपट यशस्वी होणं माझ्यासाठीही महत्त्वाचं आहे,” असे शहनाज म्हणाली.
View this post on Instagram
याशिवाय, राघवने इंडस्ट्रीत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आजचं स्थान मिळवलं असल्याचं सांगत तिने त्याच्या संघर्षाचं कौतुकही केलं. शहनाजच्या या प्रतिक्रियेनंतर डेटिंगच्या चर्चांवर पडदा पडण्याऐवजी चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.






