Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonu Sood Birthday : इंजिनिअर ते बॉलिवूड स्टार! ‘दबंग’चा खलनायक ते कोविडमधील ‘रिअल हिरो’; असा आहे सोनू सूदचा प्रेरणादायी प्रवास

Sonu Sood Birthday : इंजिनिअरिंगपासून बॉलिवूडपर्यंतचा सोनू सूदचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या. 'दबंग'चा खलनायक ते कोविड काळातील लाखोंचा 'रिअल हिरो' कसा बनला?

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 10:20 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sonu Sood Birthday: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आज (३० जुलै) आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे( Sonu Sood Birthday). पडद्यावर खलनायकाच्या दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सोनू सूदने कोविड-१९ महामारीच्या काळात लाखो गरजूंना मदतीचा हात देत खऱ्या आयुष्यातील ‘रिअल हिरो’ म्हणून नवी ओळख निर्माण केली. अभिनय आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोनू सूदचा प्रवास जाणून घ्या

इंजिनिअरिंगपासून अभिनयाकडे

३० जुलै १९७३ रोजी पंजाबमधील मोगा येथे जन्मलेल्या सोनू सूदने नागपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणादरम्यानच त्याने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. मॉडेलिंगमध्ये मिळालेल्या यशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने अभिनयालाच करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण भारतीय चित्रपटांतून झाली कारकिर्दीची सुरुवात

१९९९ मध्ये सोनू सूदने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये त्याने प्रभावी भूमिका साकारल्या. विशेषतः अभिनेता नागार्जुनसोबतच्या ‘सुपर’ या चित्रपटातील खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

Ramayana Trailer Out: “अपनी सीता को वापस लाऊंगा!” रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम अन् यशचा रौद्र रावण; ‘रामायण’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित

‘दबंग’मधील ‘छेदी सिंह’ने दिली नवी ओळख

२००२ मध्ये ‘शहीद-ए-आझम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मात्र, सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातील ‘छेदी सिंह’ या खलनायकाच्या भूमिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भूमिकेनंतर तो बॉलिवूडमधील आघाडीच्या खलनायकांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला.

जॅकी चॅनसोबतही केली स्क्रीन शेअर

सोनू सूदने भारतीय चित्रपटांपुरतेच स्वतःला मर्यादित ठेवले नाही. २०१७ मध्ये तो आंतरराष्ट्रीय स्टार जॅकी चॅनसोबत ‘कुंग फू योगा’ या चित्रपटात झळकला. या चित्रपटातील त्याच्या अभिनय आणि अॅक्शनचे जागतिक स्तरावर कौतुक झाले.

कोविड काळात बनला लाखोंचा ‘रिअल हिरो’

२०२० मध्ये कोविड-१९ महामारीदरम्यान देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हजारो स्थलांतरित कामगार आपल्या गावी जाण्यासाठी अडकले होते. अशा वेळी सोनू सूदने स्वतः पुढाकार घेत अनेक कामगारांना बस, रेल्वे आणि इतर माध्यमांतून सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवले. याशिवाय शिक्षण, वैद्यकीय उपचार, ऑक्सिजन, औषधे, रोजगार आणि आर्थिक मदत अशा विविध माध्यमांतूनही त्याने असंख्य गरजूंना सहाय्य केले.

त्याच्या या कार्यामुळे लोकांनी तो’रिअल हिरो’ आणि ‘गरिबांचा तारणहार’ म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही तो विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंच्या मदतीसाठी कार्यरत आहे.

Ramayana Trailer Reaction: ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये रणबीर-यशची चर्चा, पण हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओल गायब; चाहते नाराज

वैयक्तिक आयुष्यही तितकेच प्रेरणादायी

सोनू सूद ने १९९६ मध्ये त्याची कॉलेजमैत्रीण सोनाली सूद हिच्याशी विवाह केला. शिक्षणादरम्यान सुरू झालेली त्यांची मैत्री पुढे प्रेमात बदलली. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. सोनाली नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते, तर सोनू सूद अभिनय, कुटुंब आणि समाजसेवा यांचा समतोल राखत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.

आज ५२व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावरून सोनू सूदवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पडद्यावरील खलनायकापासून खऱ्या आयुष्यातील ‘रिअल हिरो’पर्यंतचा त्याचा प्रवास आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Sonu sood birthday special from bollywood star to real life hero

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Birthday
  • Entertainemnt News
  • sonu sood

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
1

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई
3

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका
4

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.