Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘कृष्णाईच्या लेकी’च्या सेटवर तेजश्री प्रधान-निवेदिता सराफ यांची भेट; रंगल्या ‘अग्गंबाई सासूबाई’च्या आठवणी!

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांची खास भेट झाली. ‘अग्गंबाई सासूबाई’च्या आठवणींना उजाळा देत तेजश्रीने निवेदिता ताईंविषयीचा जिव्हाळा व्यक्त केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 17, 2026 | 01:18 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजनविश्वातील काही नाती पडद्यापलीकडेही जपली जातात. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांचं नातं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत सासू-सुनेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या दोघींचा जिव्हाळा आजही कायम आहे.

सध्या निवेदिता सराफ झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत कृष्णाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री आणि निवेदिता सराफ यांची पुन्हा एकदा खास भेट झाली. ‘वीण दोघातली हे तुटेना’ मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान नुकतीच ‘कृष्णाईच्या लेकी’च्या प्रमोशनल शूटसाठी सेटवर पोहोचली होती.

खानावळीच्या सेटवर कृष्णाई आणि तिच्या लेकींसोबत चित्रीकरण करताना तेजश्रीला ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. निवेदिता ताईंना पुन्हा भेटून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खास असल्याचे तेजश्रीने सांगितले.

या भेटीबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली, “निवेदिता ताईंना भेटण्याचा अनुभव नेहमीच खास असतो. ‘कृष्णाईच्या लेकी’च्या सेटवर क्रॉस प्रमोशनसाठी गेले होते आणि खूप मजा आली. ‘अग्गंबाई सासूबाई’च्या दिवसांच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पहिल्या प्रोमो शूटच्या दिवशीच आमचं इतकं छान जुळून आलं होतं की आम्ही सतत गप्पा मारत होतो. तेव्हा डॉ. गिरीश ओक यांनी ‘संपूर्ण मालिकेसाठी थोड्या गप्पा राखून ठेवा’ असं म्हटलं होतं आणि आम्ही सगळे खळखळून हसलो होतो. तो प्रसंग आजही लक्षात आहे.”

तिने पुढे ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या टीमचंही कौतुक केलं. “कृष्णाईच्या तीनही लेकी खूप छान आहेत. संपूर्ण टीम उत्तम आहे. झी मराठी नेहमी वास्तववादी विषय आणि भावना प्रेक्षकांसमोर आणतं. निवेदिता ताई आणि मी पुन्हा एकदा झी मराठीवर एकत्र आलो आहोत, याचा आम्हा दोघींनाही आनंद आहे. सेट, दिग्दर्शन टीम, डीओपी आणि विशेषतः खानावळीचा सेट अतिशय सुंदर तयार करण्यात आला आहे,” असं ती म्हणाली.

अनेक MRI-CT स्कॅन, वेदनादायी उपचार, गंभीर समस्येमुळे त्रस्त Sonu Nigam; गायकाने चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

निवेदिता सराफ यांच्या स्वभावाविषयी बोलताना तेजश्री भावूक झाली. “मला निवेदिता ताई खूप आवडतात. त्या अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांच्या आसपास काम करताना एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. त्यांची एक खास सवय म्हणजे तुम्ही एखादी आवडीची गोष्ट सहज बोलून जाता आणि विसरूनही जाता. पण त्या ती लक्षात ठेवतात आणि काही दिवसांनी स्वतः बनवून घेऊन येतात. इतका त्यांचा आपुलकीचा स्वभाव आहे,” असे तेजश्रीने सांगितले.

Pranit More: प्रणित मोरे-हिमांशूच्या वाढल्या अडचणी, NCWच्या तक्रारीनंतर नवी FIR दाखल, गुरुग्राम पोलिसांची कारवाई

याच जिव्हाळ्याची प्रचिती देताना ती म्हणाली, “त्या माझ्यासाठी इतक्या जवळच्या आहेत की मला मासे खायची इच्छा झाली तर मी कधीही त्यांच्या घरी जाऊ शकते. ते माझं हक्काचं घर आहे.” तेजश्रीच्या या मनोगतातून तिचे आणि निवेदिता सराफ यांचे पडद्यावरील नाते आता खऱ्या आयुष्यातील घट्ट कौटुंबिक नात्यात रुपांतरित झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Web Title: Tejashri pradhan and nivedita saraf reunite on the set of krishnaichya leki relive aggabai sasubai memories

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • Nivedita Saraf
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
1

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
3

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.