
Tejaswini Lonari: चाहत्यांना गोड सरप्राइज! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Tejaswini Lonari blessed with Baby Boy: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या आयुष्यात एका गोड पाहुण्याचे आगमन झाले आहे. तेजस्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, चाहत्यांनी तिच्या या आनंदाच्या बातमीवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तेजस्विनी आणि तिचे पती शिवसेना नेते समाधान सरवणकर यांच्या कुटुंबात एका चिमुकल्या पावलांचे आगमन झाले. बाळाच्या किलबिलाट आवाज असल्याने लोणीकर आणि सरवणकर या दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आनंदाचा क्षण आला आहे. अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करणारी तेजस्विनी आता आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, ही बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. बाळाच्या बाबांनी पोस्ट करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे.
समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत मुलाच्या जन्माची माहिती दिली. त्यांच्या पोस्टमधून आई-बाबा झाल्याचा आनंद अगदी मनापासून व्यक्त झाला. आयुष्यात एका छोट्या जीवाच्या येण्याने घराचं जगच बदलून गेल्याची भावना त्यांच्या शब्दांतून जाणवली. आपल्या चिमुकल्या मुलाचं स्वागत करताना त्यांनी त्याच्यासोबत पुढचं आयुष्य सुंदर आठवणींनी भरून जाण्याची इच्छा व्यक्त केली. या पोस्टनंतर काही वेळातच चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, राजकीय क्षेत्रातील सहकारी आणि तेजस्विनीचे चाहते अशा अनेकांनी या जोडप्याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांचा विवाह डिसेंबर महिन्यात पार पडला होता. लग्नानंतर काही काळातच त्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा सुंदर टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ खास आणि अविस्मरणीय ठरला आहे.
Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! अग्निशमन दल घटनास्थळी, मोठी अपडेट समोर
मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयातील सहजपणा आणि व्यक्तिमत्त्वामुळे तिला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. ‘बिग बॉस मराठी’मधील तिच्या सहभागामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. घरातील तिचा स्वभाव, तिचं बोलणं आणि खेळण्याची पद्धत यामुळे ती प्रेक्षकांच्या चर्चेत राहिली होती.
समाधान सरवणकर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यामुळे या दोघांच्या लग्नाचीही चांगलीच चर्चा झाली होती. आता त्यांच्या संसारात मुलाचं आगमन झाल्याने या नात्याला आणखी एक सुंदर वळण मिळालं आहे.
कलाकारांच्या आयुष्यातील खास क्षण जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. तेजस्विनीने आई झाल्याची बातमी दिल्यानंतर तिच्या चाहत्यांसाठीही हा आनंदाचा क्षण ठरला आहे. सोशल मीडियावर अभिनंदनाचे संदेश, शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, या गोड बातमीत कोणताही मोठा गाजावाजा न करता साधेपणाने हा आनंद चाहत्यांसोबत शेअर करण्यात आला. त्यामुळे या जोडप्याच्या पोस्टलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.