मतदारांनी घराणेशाही नाकारली! दिगज्जांच्या नातेवाईकांना पराभवाचा फटका, मुंबईत कुणाकुणाचे नातेवाईक पडले? वाचा सविस्तर
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाचे निकाल हाती असून भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या निकालात काही धक्कादायक निकाल लागले आहेत. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसले. समर्थकांना एक ना एक प्रकारे धक्का बसला आहे. नवीन आणि पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत विजयाला गवसणी घातली आहे. याच सर्व पक्षाच्या उमेदवारांचा समावेश हा विशेष मानला जाईल. निकाल हाती येत असताना काही दिग्गज आणि जेष्ठ नगरसेवक हे पिछाडीवर असल्याचं ही चित्र पाहायला मिळालं. पण सर्वात जास्त चर्चा ही धक्कादायक निकालाचीच मुंबईत रंगली होती.
शिवसेना ठाकरे गटात असलेले आणि एके काळचे उद्धव ठाकरे यांचे विश्वास समजले जाणारे रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर या निवडणूक रिंगणात होत्या. यंदा शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली होती. वॉर्ड क्रमांक ७३ मधून निवडणूक लढवली असता त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेने ठाकरे गटाच्या लोना राजेंद्रसिंह रावत यांनी मोठ्या फरकाने पराभवे केला. वायकरांसाठी हा मोठा धक्का मानला जातो. त्यांच्यात बालेकिल्ल्यात त्यांना दुसऱ्यांदा पराभव स्विकारावा लागला आहे. आधी विधानसभेला पत्नीचा पराभव नंतर महापालिकेला मुलीचा पराभव झाला आहे. लोकसभेला ते स्वत: फक्त 48 मतांनी जिंकले होते.
दुसरा धक्कादायक निकाल म्हणजे धारावीच्या वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा सुमारे १४५० मतांनी पराभव केला. वैशाली शेवाळे या शिवसेना शिंदे गटाचे हे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहीनी आहेत. वैशाली शेवाळे या माजी नगरसेवक होत्या. त्यामुळे शेवाळे आणि त्याच बरोबर शिवसेना शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर दादरच्या वार्ड क्रमांक 194 वर सर्वांचे लक्ष होते. इथं ही हायव्होल्टेज लढत होती. माजी आमदार सदा सरवणकर यांचा पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना इथून पराभवाचा धक्का बसला आहे.
दादर हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. सरवणकर यांची येथे चांगली ताकद आहे. पण यावेळी त्यांना दादरकरानींना पाठिंबा दिला नाही. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.या ठिकाणी ठाकरे गटाचे माजी आमदार सुनिल शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 33 मधली निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली होती. येथे आमदार अस्लम शेख यांची बहीण कामरजा सिद्दीकी निवडणूक रिंगण्यात होत्या. त्यांनी अपेक्षित ठिकाणी मोठा विजय मिळवला. सर्व लक्ष्यांचे १७३ वार्डचा निकाल सर्वांना चक्रावून टाकला होता.
हा वॉर्ड जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला गेला होता. म्हणूनच भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी येथे बंडखोरी केली होती. म्हणूनच निवडणूक चर्चेचा विषय बनली होती. प्रभाग क्रमांक १७३ मध्ये माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांनी शिवसेना शिंदे यांच्या निवडीची घोषणा केली. भाजप पक्षांतर करणाऱ्या शिल्पा केळुस्कर यांनीच त्यांचा पराभव केला आणि विजय नोंदवला. हा शिंदे यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो. विद्यमान नगरसेवकांना पराभव स्वीकारताना दिसत होता. भाजपच माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ही विजय मिळवला आहे. त्यांना या वार्डमध्ये मतविभागणीचा फायदा मिळाला.
शिवसेनचा माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा विश्वनाथ महाडेश्वर या प्रभाग क्रमांक ८७ मधून विजयी झाल्या आहेत. तर सर्वात धक्कादायक आणि आश्चर्यकारक निकाल हा भायखळ्यातून आला आहे. प्रभाग क्रमांक 207 मधून डॉन अरूण गवळी याची मुलगी योगित गवळी ही पराभवाचा धक्का बसला आहे. गवळीच्या वर्चस्वाला या धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाते मिलिंद वैद्य हे विजयी झाले आहेत. तर भाजपा राजन पारकर हे पराभूत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे बंधू कॅप्टन मलिक यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले रवी राजा यांचा पराभव झाला आहे.






