Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Fix Trailer: ‘द फिक्स’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित! लिअम नीसन, झॅकरी लेव्हीसोबत एलनाझ नोरोझीची दमदार एंट्री

The Fix Trailer: 'द फिक्स'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा हॉलिवूड अॅक्शन-थ्रिलर ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 05, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Fix Trailer:  हॉलिवूडमधील आगामी गुप्तहेर-अॅक्शन थ्रिलर ‘द फिक्स’ (The Fix) चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ‘हॉटेल तेहरान’ (Hotel Tehran) या नावाने ओळखला जात होता.

सीआयएच्या धोकादायक मिशनची कथा

दिग्दर्शक गाय मोशे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘द फिक्स’ हा चित्रपट अफगाणिस्तानातील एका शोकांत मोहिमेच्या आठवणींनी पछाडलेल्या सीआयए पथकाभोवती फिरतो. अनुभवी एजंट लॅरी (लिअम नीसन) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टकर (झॅकरी लेव्ही) यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तेहरानमधील एका अत्यंत धोकादायक मिशनवर निघते. या मोहिमेत सुटका, रहस्य आणि स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी दडलेली असते.

एलनाझ नोरोझीच्या भूमिकेची चर्चा

चित्रपटात एलनाझ नोरोझी ‘झारा’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिची प्रभावी उपस्थिती लक्षवेधी ठरत असून, लिअम नीसन आणि झॅकरी लेव्हीसोबत ती कथानकाच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसते. तिची भूमिका शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि भावनिकदृष्ट्या तीव्र असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.

Indian Film Producers : भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा! नव्या प्रतिभेला संधी देणारे ‘हे’ ५ नामवंत निर्माते

दमदार स्टारकास्ट

‘द फिक्स’मध्ये टायटस वेलिव्हर, नविद नेगहबान, वेस चॅथम आणि क्विन्सी आयझाया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

एलनाझच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा

‘सेक्रेड गेम्स’, ‘मेड इन हेवन’ आणि आंतरराष्ट्रीय मालिका ‘तेहरान’मधून ओळख निर्माण केल्यानंतर एलनाझ नोरोझीने ‘कंदहार’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ‘द फिक्स’मधून ती जागतिक स्तरावरील दोन दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असून, तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

इराणमध्ये जन्मलेल्या एलनाझसाठी इराणच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. इराण, जर्मनी आणि भारत अशा तीन देशांमध्ये विस्तारलेल्या तिच्या कारकिर्दीला ‘द फिक्स’मुळे नवी उंची मिळण्याची शक्यता आहे.’द फिक्स’ हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

Web Title: The fix trailer liam neeson zachary levi elnaaz norouzi powerful entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
1

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
2

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…
3

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
4

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.