
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष Pahlaj Nihalani यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सेन्सॉर बोर्डातील त्यांच्या कडक भूमिकेसाठी ते ओळखले जात होते. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
पहलाज निहलानी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील Nanavati Hospital येथे उपचार सुरू होते. प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र, राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे जवळचे मित्र शशी रंजन यांनी दुजोरा दिला आहे.
पहलाज निहलानी हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हते, तर चित्रपटसृष्टीतील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. ते जवळपास 29 वर्षे असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स या संस्थेचे अध्यक्ष होते. 2009 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्यांची CBFC अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मात्र, 2017 मध्ये त्यांना या पदावरून हटवण्यात आले.
त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक भूमिकांमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या Hathkadi या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्माता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या निर्मितीतील चित्रपटांमधून Govinda आणि Chunky Panday यांसारख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. Gunaahon Ka Faisla, Paap Ki Duniya, Mitti Aur Sona, Shola Aur Shabnam आणि Aankhen यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. यापैकी आंखे हा चित्रपट 1990 च्या दशकातील सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो.निर्माता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवल्यानंतर निहलानी यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकले. 2012 मध्ये त्यांनी Avatar या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच अभिनयाचीही त्यांना आवड होती.
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या Halla Bol या चित्रपटात त्यांनी छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती.चित्रपटसृष्टीपलीकडेही त्यांच्या काही कृतींमुळे ते चर्चेत राहिले. 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी Narendra Modi यांच्या समर्थनार्थ “हर हर मोदी, घर घर मोदी” हे प्रचारगीत तयार केले होते. या गीतामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.निर्माता, दिग्दर्शक, संघटक आणि वादग्रस्त वक्ते अशी विविध ओळख असलेल्या पहलाज निहलानी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडने एक अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व गमावले आहे.