Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांमधील गंभीर आजारांना बसणार लगाम; AIIMS नागपूरकडे राज्याच्या विशेष मोहिमेची धुरा

युनिसेफचे संजय सिंग यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत असून शासन, वैद्यकीय संस्था व तज्ज्ञ यांना एकत्र आणून बाल असंसर्गजन्य आजारांसाठी शाश्वत उपाय योजना सक्षमीकरण गरजेचे असल्याचे सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 10, 2026 | 03:50 PM
मुलांमधील गंभीर आजारांना बसणार लगाम; AIIMS नागपूरकडे राज्याच्या विशेष मोहिमेची धुरा
Follow Us
Follow Us:

AIIMS नागपूर व महाराष्ट्र शासन यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
बालपणातील स्थूलता, टाइप-१ मधुमेह आणि आजारांचे प्रमाण वाढलेले 
बालकांच्या आरोग्याला सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई: भारतामध्ये बालपणातील स्थूलता, टाइप-१ मधुमेह आणि दमा यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे (NCDs) प्रमाण वाढत आहे. या आजारांची सुरुवात लहानपणी झाल्यास दीर्घकालीन आरोग्य आणि आर्थिक परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी आरोग्य भवन येथे एआयआयएमएस, नागपूर (AIIMS Nagpur) यांच्यासोबत सामंजस्य करार केला. या उपक्रमाला युनिसेफ महाराष्ट्रकडून धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य मिळणार असून, बालपणातील असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनाला बळकटी देण्याचा उद्देश आहे. बालकांच्या आरोग्याला अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हा करार मा. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मा. आमदार नाना पाटोले, तसेच राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी डॉ. निपुण विनायक, आयएएस, सचिव आरोग्य विभाग, डॉ. कादंबरी बालकवडे, आयएएस, आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य सेवा, मुंबई युनिसेफ महाराष्ट्र प्रमुख संजय सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हा उपक्रम राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत बालकांमधील असंसर्ग्यजन्य आजारांसाठी एकात्मिक, शाश्वत व प्रणालीआधारित उपाययोजना राबविण्याचा पहिला व्यापक प्रयत्न आहे. एआयआयएमएस नागपूर हे मुख्य केंद्र म्हणून कार्य करणार असून युनिसेफमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल.

शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता

या करारांतर्गत:
* टाइप १ मधुमेह, दमा, स्थूलता, मानसिक आरोग्य, जन्मजात हृदयविकार व सिकल सेल आजार यांसाठी मानक उपचार प्रोटोकॉल विकसित करण्यात आले आहेत
* १० जिल्हा रुग्णालयांमध्ये बाल असंसर्गजन्य आजारांवर उपाययोजनेसाठी क्लिनिक्स सुरू करण्यात येणार आहेत
* आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण प्रमुख जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल
* समुदाय स्तरावर तपासणी व संदर्भ प्रणाली मजबूत करण्यात येईल
डॉ. प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक, एआयआयएमएस नागपूर यांनी या करारामुळे तज्ज्ञ वैद्यकीय ज्ञानाचे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी रूपांतर होईल, असे सांगितले.

मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

युनिसेफचे संजय सिंग यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत असून शासन, वैद्यकीय संस्था व तज्ज्ञ यांना एकत्र आणून बाल असंसर्गजन्य आजारांसाठी शाश्वत उपाय योजना सक्षमीकरण गरजेचे असल्याचे सांगितले.

 

Web Title: Aiims nagpur lead maharashtra first initiative for prevention and management of non communicable diseases in children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • AIIMS
  • Maharashtra Health Department
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास
1

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
2

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.