
फोटो सौजन्य सोशल मिडिया
रक्तातील ऑक्सिजन कमी असणे आणि हायपोक्सिया यात फरक आहे; परंतु रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळेच पुढे शरीराच्या ऊतींमध्ये हायपोक्सियाची समस्या निर्माण होते. शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत राहण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असल्याने, ही एक अत्यंत गंभीर आणि काळजी घेण्यासारखी स्थिती आहे.
प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्यास शरीर त्याची भरपाई करण्यासाठी श्वासोच्नुास आणि हृदयाची गती वाढवण्याचा प्रयान करते.सुरुवातीला धाप लागणे, वेगाने श्वास घेणे, हृदयाची घडघड वाढणे, अरकरण वाटणे, चकवा, डोकेदुखी किंवा एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे जाणवू शकतात.
दमा, न्यूमोनिया, तीव श्वसनसंसर्ग दीर्घकालीन फुफ्फुसविकार, फुफ्फुसातील रक्तवाहिनीत गुठळी अडकणे, हृदयविकार तसेच जन्मजात हृदयदोष यामुळे हायपोंविसया होऊ शकतो, तीव्र रक्तक्षयामध्येही शरीराच्ण ऊतींपर्यंत पुरेसा प्राणवायू, पोहोचण्यात अडथळा येऊ शकतो. श्वसनमार्गात अडपळा निर्माण होणे किंवा अतिउंच प्रदेशात अचानक गेल्यामुळेही समस्या उद्भवू शकते. मुलांमध्ये श्वसनमार्गाचे संसर्ग आणि काही जन्मजात विकार ही महत्वाची कारणे तरू
हायपॉक्सिया म्हणजे शरीरातील ऊतींना आवश्यक तेवढा प्राणवायू न मिळण्याची अवस्था. दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, रक्तक्षय तसेच श्वसनमार्गातील अडथळ्यांमुळे ही समस्या उद्भवू शकते. धाप लागणे, वेगाने श्वास घेणे, हृदयाची गती वाढणे, चक्कर येणे आणि एकाग्रता कमी होणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.