Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

महाराष्ट्रात योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत संयुक्तरीत्या राबविली जाते. यामध्ये पिवळे, केशरी रेशनकार्डधारक आणि इतर पात्र घटक यांचा समावेश आहे. या माध्यमातून लाखो कुटुंबांना आरोग्य सुरक्षेची हमी मिळते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 10, 2025 | 02:35 AM
PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत
Follow Us
Close
Follow Us:

जन आरोग्य  योजनेत 30 विशेष उपचार श्रेण्या उपलब्ध
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची महत्त्वाची योजना
5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा

पुणे: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची महत्त्वाची आरोग्य विमा योजना (Health News)आहे. या योजनेद्वारे गरीब आणि गरजू कुटुंबांना दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा दिली जाते, ज्यामुळे देशभरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार मिळू शकतात. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत पुणे (Pune News) जिल्ह्यातील 80,423 नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभार्थी कुटुंबांना आतापर्यंत 209 कोटी 29 लाख 50 हजार 115 रुपयांची मदत मिळाली आहे. महाराष्ट्रात ही योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत संयुक्तरीत्या राबविली जाते. यामध्ये पिवळे, केशरी रेशनकार्डधारक आणि इतर पात्र घटक यांचा समावेश आहे. या माध्यमातून लाखो कुटुंबांना आरोग्य सुरक्षेची हमी मिळते.

पुणे जिल्ह्यातही हजारो रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेषतः गरीब कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हवेली तालुक्याने सर्वाधिक लाभ घेतला असून 16,987 रुग्णांना एकूण 43 कोटी 91 लाख 26 हजार 320 रुपयांची मदत मिळाली आहे. सर्वात कमी लाभ वेल्हे तालुक्यात झाला असून 776 रुग्णांना 1 कोटी 83 लाख 82 हजार 300 रुपयांची मदत मिळाली आहे.

योजनेत 30 विशेष उपचार श्रेण्या उपलब्ध

सामान्य शस्त्रक्रिया, ईएनटी शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टरोलॉजी शस्त्रक्रिया, हृदयरोग उपचार व शस्त्रक्रिया, बाल शल्यक्रिया, यूरोलॉजी, न्यूरोशस्त्रक्रिया, सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, भाजलेल्या रुग्णांचे उपचार, पॉली ट्रॉमा, कृत्रिम अवयव, क्रिटिकल केअर, सामान्य औषधोपचार, संसर्गजन्य रोग, बालरोग, कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, पल्मोनोलॉजी, त्वचारोग, संधिवात, एंडोक्राइनोलॉजी, गॅस्ट्रोएन्टरोलॉजी आणि इंटरव्हेन्शनल रेडियोलॉजी.

Health Care : शांत झोप काळोखातच का लागते ? काय आहे यामागील शास्त्रीय कारण

तालुका निहाय आकडे

तालुका           रुग्ण संख्या      प्राप्त रक्कम

आंबेगाव         2,934        7,56,77,855

बारामती          4,837       13,69,26,690

भोर             2,195        6,11,98,960

दौंड            4,083         10,90,66,845

हवेली          16,987       43,91,26,320

इंदापूर          4,484         13,33,01,010

जुन्नर          5,945         16,36,10,190

खेड            3,812         8,90,23,250

मावळ         4,685        11,30,25,730

मुळशी         2,394        5,57,60,900

पुणे शहर      20,719       52,43,11,290

पुरंदर           2,785        7,38,25,370

शिरूर          3,787        9,98,13,405

वेल्हे           776           1,83,82,300

एकूण       80,423       2,09,29,50,115

“आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाद्वारे सरकारकडून विविध आजारांवर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. याचे काटेकोर पालन केले जाते. पात्र नागरिकांनी लवकरात लवकर आपले आयुष्मान कार्ड तयार करून योजनांचा लाभ घ्यावा.”

– वैभव गायकवाड, विभागीय व्यवस्थापक, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, पुणे विभाग

Web Title: More 80 thousand citizens of pune benefited from pradhan mantri jan arogya yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Health News
  • Medical Sector
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
1

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
2

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! स्वारगेट स्थानकात चार्जिंग सुविधा उपलब्ध; सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नवीन बोर्ड
3

‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! स्वारगेट स्थानकात चार्जिंग सुविधा उपलब्ध; सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नवीन बोर्ड

Pune Municipal Election : उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक, भाजपकडे रांग; इच्छुक उमेदवारांना…
4

Pune Municipal Election : उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक, भाजपकडे रांग; इच्छुक उमेदवारांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.