साखरेपेक्षा काय गोड तर झोप, असं म्हणतात ते काही खोटं नाही. शांत झोप कोणाला नको असते. सर्वसाधारण पाहायचं झालं तर, रात्री शांत झोपेसाठी लाईट्स बंद करण्याची अनेकांना सवय असते. लाईट्स बंद केल्याशिवाय काही जणांना झोप लागतच नाही. याचं नेमकं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितेय का ? मानवी मेंदूमध्ये असलेली पिनियल ग्रंथी ‘मेलाटोनिन’ नावाचं हार्मोन तयार करते. हे हार्मोन मेंदूला शांत झोपेसाठी सिग्नल देतात. दिवस उतरताच आणि आजूबाजूला प्रकाश कमी होताच या हार्मोन्सची निर्मिती वाढते

मानवी मेंदूमध्ये असलेली पिनियल ग्रंथी ‘मेलाटोनिन’ नावाचं हार्मोन तयार करते. हे हार्मोन मेंदूला शांत झोपेसाठी सिग्नल देतात.

दिवस उतरताच आणि आजूबाजूला प्रकाश कमी होताच या हार्मोन्सची निर्मिती वाढते.

याचबरोबर मानवी शरीरात सर्केडियन रिदम’ नावाची सिस्टिम असते.

आपल्या शरीरात २४ तासांचा जैविक घड्याळ असतो. जगण्याची नैसर्गिक पद्धत अशी आहे की, रात्र होतात झोप येते.

म्हणूनच जर लाईट्स चालू राहिले तर झोपेत अडथळ निर्माण होतो. ज्यांना जास्त विचार येतात किंवा ‘ओव्हरथिंकिंग’ असतं, त्यांना अंधारात झोप पटकन लागते.

काही जणांनी लहानपणी अंधारात झोपायची सवय लावलेली असते. त्यामुळे नंतर मेंदूला त्या वातावरणातच “सुरक्षित” आणि आरामशीर वाटतंआणि शांत झोप लागते.






