सकस आहाराच्या (Healthy Diet) मदतीने तुम्ही तुमच्या फुफ्फुसांना (Lungd) दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता. भारताविषयी बोलायचे झाले तर, येथे वायू प्रदूषण आणि धूम्रपानाच्या (Smoking) वाढत्या घटनांमुळे फुफ्फुसांशी संबंधित समस्यांना खूप सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हाला तुमची फुफ्फुस निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. कोणती आहेत ही फळ जाणून घ्या.
फुफ्फुस हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. फुफ्फुसातून फिल्टर केल्यानंतरच ऑक्सिजन आपल्या संपूर्ण शरीरात पोहोचतो. अशा स्थितीत फुफ्फुसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. वायू प्रदूषण, धुम्रपान इत्यादींचा फुफ्फुसावर खूप वाईट परिणाम होतो. या सर्व गोष्टींमुळे एखाद्याला दमा, ब्राँकायटिस, न्यूमोनिया, टीबी, कॅन्सर यांसारख्या जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे.
अक्रोड – अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनमधून प्रकाशित झालेल्या जर्नलनुसार, अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. रोज मूठभर अक्रोडाचा आहारात समावेश केल्यास फुफ्फुसाच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. श्वासोच्छवासाच्या समस्या म्हणजे दम्यामध्ये देखील हे फायदेशीर आहे.
फॅटी फिश– ज्या माशांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते अशा माशांचे सेवन फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण पुरेसे असते.
बेरी– कोणत्याही प्रकारच्या बेरीचे सेवन केल्याने फुफ्फुसे निरोगी राहतात. बेरीमध्ये व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. ब्रोकोली- अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त ब्रोकोली फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहे. फुफ्फुसाव्यतिरिक्त ब्रोकोली शरीराच्या स्टॅमिना साठी देखील चांगली मानली जाते.
आले- आल्यामध्ये केवळ दाहक-विरोधी गुणधर्म नसून ते फुफ्फुसातील प्रदूषण दूर करण्यासही मदत करते. आल्याचे सेवन केल्याने फुफ्फुसातील वायुमार्ग उघडतात आणि ऑक्सिजनचे परिसंचरण चांगले होते. तसेच, ते फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
सफरचंद– रोज सफरचंद खाणे निरोगी फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. यातील जीवनसत्त्वे फुफ्फुसांना निरोगी ठेवतात. एका संशोधनानुसार, व्हिटॅमिन-ई, सी, बीटा कॅरोटीन आणि लिंबूवर्गीय फळे फुफ्फुसांसाठी खूप चांगली मानली जातात.
फ्लेक्ससीड्स– एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जवसाच्या बिया खाल्ल्याने फुफ्फुसांचे नुकसान होण्यापासून तर बचाव होऊ शकतोच, पण इजा झाल्यानंतरही या बियाण्यांनी फुफ्फुसे बरे होऊ शकतात.