सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं दुधाचा चहा पिण्याची सवय असते. याशिवाय ग्रीन टी, हर्बल किंवा कॉफीचे सेवन करतात. पण साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. उपाशी पोटी साखरेचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर वाढून मधुमेह किंवा उच्चरक्तदाबा सारख्या गंभीर समस्या वाढू शकतात. त्यामुळे सकाळी किंवा इतर वेळी गुळाच्या चहाचे सेवन करावे. गूळ खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचा चहा प्यायल्यास शरीरात उबदारपणा वाढेल. जाणून घ्या गुळाचा चहा प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
साखरयुक्त चहा पिण्याऐवजी सकाळी उठल्यानंतर प्या गुळाचा चहा!
शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. नियमित एक खडा गुळाचा खाल्ल्यास शरीराचे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचे सेवन आवर्जून करावे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात उबदारपणा वाढवतात. थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला झाल्यास गुळाचा चहा प्यावा.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. गुळाच्या चहाचे सेवन केल्यास शरीरात लठ्ठपणा वाढणार नाही. याशिवाय पोटावर वाढलेली चरबी कमी होईल.
गुळाचे सेवन केल्यामुळे पोट स्वच्छ होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी गूळ खावे. चहा बनवताना त्यात आल्याचा वापर करावा.
सर्दी खोकला झाल्यानंतर गूळ, काळीमिरी, लवंग, आलं आणि इतर औषधी मसाल्यांचा वापर करून चहा बनवावा. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीराला फायदे होतात.