पुणे: पुण्यात हत्येचं सत्र सुरूच आहे. आता पुन्हा पुण्यात एक हत्येची घटना समोर आली आहे.मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आली आहे. ही घटना वाघोली परिसरात प्यासा हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बादल शेख असे आहे. आरोपी दोघेही गुन्हेगारी असल्याची माहिती समोर आली आहे.
कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला
पुढे आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोली परिसरात प्यासा हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बादल शेख असे आहे. आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला असून वाघोली पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ही हत्या नेमकं कोणत्या कारणातून झाली. याचे शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान पुण्यात सतत हत्या, चोरी, हाणामारी, मारहाण, दहशत निर्माण करणं असे अनेक घटना समोर येत आहेत. पुण्यात प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत, तरीही रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि गॅंगसंबंधित हल्ल्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भय आणि असुरक्षा वाढली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अनावश्यक रस्त्यावर थांबणे किंवा अंधारात एकटे फिरणे टाळावे, अशी शहाणपणाची सूचना पोलीस देत आहेत. पोलीस यंत्रणा आरोपींवर लक्ष ठेवून त्वरित कारवाई करण्यासाठी तत्पर असून, शहरात शांतता व सुरक्षितता कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
कोथरूडच्या डावी भुसारी कॉलनीतील एका इमारतीत घरफोडीसाठी शिरलेल्या चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला. पण, या चोरट्यांनी रिकाम्या हाती माघार घेताना येथील सीसीटीव्ही कॅमेरासमोर हात उंचावून पिस्तुल व कटावणी दाखवत अप्रत्यक्षपणे पोलिसांनाच आव्हान दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
चोरट्यांच्या या आव्हानाची जोरदार चर्चा झाली. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसही कामाला लागले. घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर बिबवेवाडीतून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावेळी चोरट्यांकडे पिस्तुल सदृश्य लायटर असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोथरूड येथील परमहंसनगरच्या श्री सुवर्ण सोसायटीत घडली आहे.