फोटो सौजन्य - Social Media
आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं अवयव म्हणजे यकृत (Liver). यकृत शरीराचे अतिशय महत्वाचे कार्य सांभाळत असतो. मग ती पचनक्रियेची प्रक्रिया सुरळीत ठेवणे असो किंवा रक्ताचे शुद्धीकरण असो. यकृत इतके महत्वाचे असते की त्याच्या कार्यप्रणालीमुळे शरीराला सतत ऊर्जा मिळत असते. या यकृताचे आरोग्य सुरळीत ठेवावे लागते. मात्र, यकृताचं आरोग्य बिघडू लागलं की शरीर आपल्याला काही स्पष्ट संकेत देतं. हे संकेत वेळेत ओळखून उपचार केले नाहीत, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
ही लक्षणं दिसल्यास ती दुर्लक्षित न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत योग्य उपचार घेतले, तर गंभीर आजारांपासून बचाव करता येतो. यकृताचं आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मद्यपान टाळणं आणि पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे.