महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी....; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
बिहारमध्ये निघालेल्या मतदार हक्क यात्रेला गेल्या तीन दिवसांत मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. खासदार राहुल गांधी यांनी बिहारमध्ये सुरू असलेले विशेष सघन पुर्नपडताळणी (SIR) विरोधात आणि मतचोरी बाबत निवडणूक आयोग आणि भाजपवर केलेल्या आरोपांविरोधात मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. आज (१९ ऑगस्ट) ही यात्रा बिहारच्या नवादा येथे पोहचली. याठिकाणी राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा आरोप केला. याचवेळी महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये झालेल्या फेरफारीकडेही केले
सैदपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, बिहारमधील तरुण त्यांची मते चोरून देतील का, नाही. कारण मतदान हा आमचा हक्क आहे. आजच्या भारतात गरिबांकडे फक्त तुमचे मत उरले आहे. जर तेही हरवले तर तुमचे सर्वस्व जाईल. तुमची जमीन, रेशन कार्ड, सर्वस्व जाईल. गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोग आणि भाजप संगनमताने निवडणुकांची चोरी करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुका, हरियाणा निवडणुका, मध्य प्रदेशच्या निवडणुका चोरल्या आहेत. महाराष्ट्रात आपण लोकसभा निवडणूक जिंकलो आणि चार महिन्यांनंतर, जेव्हा विधानसभा निवडणुका होतात तेव्हा भाजप जिंकतो.
पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
पण आमच्या टीमने केलेल्या पडताळणीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत १ कोटी मतदारांचा फरक दिसला. लोकसभा निवडणुकीत याच १ कोटी मतदारांनी आम्हाला मतदान केले असताना विधानसभा निवडणुकीत मतदान केले नाही. जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की हे १ कोटी लोक कोण आहेत, तेव्हा त्यांनी आम्हाला उत्तर दिले नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे मतदार यादी दाखवण्याची मागणी केली. पण त्यांनी तीही दाखवण्यास नकार दिला. आम्ही त्यांना मतदान केंद्रांवरील सीसीटिव्ही फुटेज मागितले, पण त्यांनी तेही देण्यास नकार दिला. त्यांनी कोणत्याही प्रकारे आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाही, म्हणजेच निवडणूक आयोग मते चोरून घेत आहे.
कर्नाटकातील बंगळुरू सेंट्रल मतदारसंघात आम्ही चौकशी केली असता, एका विधानसभेत तब्बल १ लाख बनावट मतदार असल्याचे आढळले, असा आरोप राहुल गांधींनी केला. “भाजप निवडणूक हरत होती, पण या बनावट मतांमुळे ती जिंकली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता, आयोग आम्हालाच प्रतिज्ञापत्र मागतो. आमच्याकडून नव्हे, जनताच निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र मागणार आहे. बिहारचे लोक मतांची चोरी होऊ देणार नाहीत.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर
राहुल गांधी म्हणाले, “बिहारच्या विकासाचा प्रश्न आहे. नितीशकुमार यांचे सरकार २० वर्षांपासून आहे. एक दिवस हेही समोर येईल की त्यांनी बिहारची शेवटची निवडणूक चोरली होती. जेव्हा ते सत्य बाहेर येईल, तेव्हा आम्ही कारवाई करू. रोजगार मिळत नाही, बनावट वीजबिले दिली जात आहेत, महागाई वाढते आहे. बिहारमधून ६५ लाख मतदारांना वगळले जात आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. यासाठीच आम्ही हा प्रवास सुरू केला आहे.”