तेजस्वी यादव यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; 10 जण जखमी

तेजस्वी यादव यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत.

    बिहारमधू एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav ) यांच्या ताफ्याच्या गाडीचा भीषण अपघात (Tejashwi Yadav Acciddent) झाला आहे. लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सध्या बिहारमध्ये त्यांनी जनविश्नास यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान आज त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या इतर 10 जण जखमी झाले आहेत.

    कसा झाला अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पूर्णियातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या बेलौरीजवळ भीषण अपघात झाला. तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन आणि नागरी कार यांच्यात टक्कर झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  या अपघातात एस्कॉर्ट वाहनाचा चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर, 6 पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणारे चार नागरिकही जखमी झाले आहेत. सर्व 10 जखमींना उपचारासाठी GMCH रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे,