कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकातून आगरी-कोळी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि शहराच्या विकासातील योगदान डावलल्याचा आरोप करत आगरी ग्रंथालय चळवळ संस्थेने महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले. वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करून त्याचे पुनर्लेखन करावे, तसेच पुस्तक निर्मिती समितीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.