Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

24.84 कोटी लोकांची झाली दारिद्र्यातून मुक्तता; उत्तर प्रदेशात गरिबांच्या संख्येत सर्वात मोठी घट

गेल्या नऊ वर्षांत 24.84 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्रयातून मुक्तता झाली आहे. नीती आयोगाच्या भारतातील बहुआयामी दारिद्रय २००५-०६ पासून या चर्चा अभ्यासातील निष्कर्षांमध्ये, या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हे २०१३-१४ ते २०२२-२३ ता कालावधीत दारिद्रयाच्या सर्व पैलूंवर मात करण्यासाठी सरकारने राबवलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांना देण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 16, 2024 | 07:10 AM
24.84 कोटी लोकांची झाली दारिद्र्यातून मुक्तता; उत्तर प्रदेशात गरिबांच्या संख्येत सर्वात मोठी घट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या नऊ वर्षांत 24.84 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्रयातून मुक्तता झाली आहे. नीती आयोगाच्या भारतातील बहुआयामी दारिद्रय २००५-०६ पासून या चर्चा अभ्यासातील निष्कर्षांमध्ये, या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हे २०१३-१४ ते २०२२-२३ ता कालावधीत दारिद्रयाच्या सर्व पैलूंवर मात करण्यासाठी सरकारने राबवलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांना देण्यात आले आहे.

नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांच्या हस्ते सोमवारी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांच्या उपस्थितीत चर्चा अभ्यासाचे प्रकाशन करण्यात आले. ऑक्सफर्ड पॉलिसी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (ओपीएचआय) आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) यांनी या अभ्यासाठी तांत्रिक सहकार्य प्रदान केले आहे.

बहुआयामी दारिद्रय निर्देशांक (एमपीआय) हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सर्वसमावेशक मोजमाप आहे जे आर्थिक पैलूंच्या पलीकडे अनेक पैलूंमध्ये दारिद्रयाचे मूल्यांकन करते. जागतिक कार्यपद्धती बळकट अल्किरे आणि फॉस्टर (एएफ) पद्धतीवर आधारित आहे.

चर्चा अभ्यासानुसार, भारतातील बहुआयामी दारिद्र्यात २०१३-१४ मधील २९.१७ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये ११.२८ टक्क्यांपर्यंत म्हणजे १७.८९ टक्के घट नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या नऊ वर्षात ५.९४ कोटी लोक बहुआयामी दारिद्रयातून बाहेर पडले असून, उत्तर प्रदेशमध्ये गरिबांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. त्यापाठोपाठ बिहारमध्ये ३.७७ कोटी, मध्य प्रदेश २.३० कोटी आणि राजस्थानमध्ये १.८७ कोटी लोकांची दारिद्र्यातून मुक्तता झाली आहे. गेल्या काही वर्षात भारताचा विकास झपाट्याने झाला असून, त्याचे फायदेही आता दिसत आहेत.

Web Title: 24 84 crore people were freed from poverty uttar pradesh has seen the largest decline in the number of poor nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 07:10 AM

Topics:  

  • Poverty Line
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

प्रेमासाठी कायपण! १५ वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर मामीचे प्रेम; लग्नास नकार दिल्याने पोलीस ठाण्यात जाऊन कापली नस
1

प्रेमासाठी कायपण! १५ वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर मामीचे प्रेम; लग्नास नकार दिल्याने पोलीस ठाण्यात जाऊन कापली नस

गरिबी निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस विशेष: दोन वेळेचे पोटभर जेवण हा तर प्रत्येक मानवाचा अधिकार
2

गरिबी निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस विशेष: दोन वेळेचे पोटभर जेवण हा तर प्रत्येक मानवाचा अधिकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.