
हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
दरम्यान, अंकित बालियान यांच्या हत्येनंतर त्यांनी Instagram वर केलेली शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे हत्येच्या अवघ्या दोन तास आधी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘मर्डर’चा उल्लेख असलेल्या हरियाणवी गाण्याच्या काही ओळी म्हटल्या होत्या. त्यामुळे त्यांची ही शेवटची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Aai Tuljabhavani: तुळजाई भावाला देणार जगातली सर्वात मौल्यवान भेट, रक्षाबंधन स्पेशल
35 वर्षीय अंकित बालियान यांनी 26 ऑगस्ट रोजी Instagram वर आपला शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ते निवांत आणि प्रसन्न अंदाजात दिसत होते. त्यांनी एका हरियाणवी गाण्यातील ‘मर्डर’चा उल्लेख असलेल्या काही ओळी म्हटल्या होत्या.
यानंतर अवघ्या काही तासांत त्यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने हा व्हिडिओ विशेष चर्चेत आला. मात्र त्यांच्या पोस्टचा हत्येशी काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही.
शामली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंकित बालियान हे कोतवाली शहर परिसरातील एका जिममध्ये व्यायामासाठी येत होते. बुधवारी संध्याकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ते जिममधून बाहेर पडले. याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर अंकित यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हल्ल्यात चार संशयित सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. हे चौघे दोन दुचाकींवरून घटनास्थळी आल्याचे सांगण्यात आले आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना काही रिकाम्या पुंगळ्याही आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. त्या ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तैनात केली आहेत. जिम आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपी कोणत्या दिशेने आले आणि हल्ल्यानंतर कुठे गेले, याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम
अंकित बालियान यांच्यावर हल्ला का करण्यात आला आणि या हत्येमागे नेमके कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांच्या आधारे तपास केला जात आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अंकित यांच्या हत्येपूर्वीच्या Instagram पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत असली तरी त्या पोस्टचा गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे पोलिस तपासातून समोर येणाऱ्या माहितीवरच या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.