Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Shocking Viral Video : बायकोच्या सिक्रेट बचतीवर उंदरांचा डोळा... ८ वर्षांपासून वाचवलेली रक्कम कुरतडून खाल्ली. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून महिलेने पतीच्या खिशातून तब्बल १२ लाख राशी जमा केल्याचा दावा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 25, 2026 | 11:44 AM
८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या 'मायक्रो-प्लॅनिंग'चा चुराडा; घटनेचा Video Viral

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या 'मायक्रो-प्लॅनिंग'चा चुराडा; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पतीच्या नकळत ८ वर्षे बचत करत महिलेने जमा केले तब्बल १२ लाख रुपये.
  • ट्रंक उघडताच पैशांऐवजी नोटांचे तुकडे पाहून महिलेला बसला मोठा धक्का.
  • उंदरांनी नोटा कुरतडल्याने बचतीच्या पैशांचे मोठे नुकसान; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
पत्नी आणि पैसे वाचवण्यासाठी तिच्या सुरु असलेल्या खुरापती आयडीयाजना काही तोड नाही. घरखर्चातून किंवा पतीने शाॅपिंगला दिलेल्या पैशातून पत्नी नेहमीच थोडीशी बचत बाजूला काढत असते. यातही काही महिला या पतीच्या नकळत काही पैसे पँटीतून किंवा त्याच्या शर्टातून लंपास करत असते. थोड्याथोड्या बचतीतून त्या स्वत:साठी काही खास घेऊ इ्च्छीत असतात. काहीजणी दागिन्यांसाठी ही बचत करतात तर काही घरात नवीन वस्तू आणण्यासाठी ही बचत करतात. उत्तर प्रदेशमध्ये मात्र या बचतीचे भीषण रुप पाहायला मिळाले आहे. माहितीनुसार, पत्नी ८ वर्षांपासून पतीच्या खिशातून काही पैसे काढून त्याची बचत करत होती. या ८ वर्षांमध्ये तिने तब्बल १२ लाख रुपये जमा केले पण जेव्हा पैसे वापरण्याची वेळ आली तेव्हा तिच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला.

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

काय आहे प्रकरण?

सांगितले जात आहे की, महिलेने साधारण २०१९ पासून पैशांची बचत करायला सुरुवात केली होती. वेळोसोबतच तिच्या या बचतीत वाढ होऊ लागली आणि पैसे जमा होऊ लागले. ८ वर्षांत पैशांची ही रक्कम १२ लाखांपर्यंत पोहचली. महिलेने बचतीच्या या पैशांची माहिती पतीली दिली नव्हती. पण जेव्ही बचतीचे पैसे बाहेर काढण्यासाठी तिने ट्रंक ओपन केला तेव्हा तिला धक्का बसला. अनेक वर्षे ट्रंक बंदत होता ज्यामुळे पत्नीला वाटले की पैसे सुरक्षित आहेत आणि जेव्हा फार गरज असेल तेव्हा ती या पैशांचा वापर करेल. तथापि पैशांचा हा ट्रंक उघडल्यानंतर महिलेने पाहिले की अधिकतर नोटा या खराब झाल्या होत्या. इतक्या वर्षांत उंदरांनी नोटा कुरतडून ठेवल्या होत्या. पैशांच्या या ट्रंकमधील बरेचशा नोटा या फाटल्या होत्या आणि त्यांचे फक्त तुकडेच शिल्लक होते.

झालेले नुकसान पाहता महिलेने ही घटना आपल्या पतीला सांगितली. यानंतर पतीने ट्रंक उघडला आणि सर्व नोटा पसरवून यातील फाटलेल्या नोटा तो वेगळ्या करु लागला. तथापि, बचतीच्या पैशांतील अधिकतर रक्कम ही आधीच उंदरांनी कुरतडली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून घटना इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे.

12 लाख रुपए के सारे नोट चूहे कुतर गए….
गोंडा जिले की एक महिला गहने खरीदने के लिए, पति से छुपाकर पिछले 8 साल से लिए के ट्रंक में पैसे जमा कर रही थी.
कल उसने मन बनाया कि अब सोना खरीद लिया जाते तो उसने बक्से से पैसे निकाले.
जब उसने नोटों के टुकड़े देखे तो सदमे में आ गई. तब जाकर… pic.twitter.com/AFqLAKH5BN
— Ruby Arun रूबी अरुण (@arunruby08) August 22, 2026

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

व्हिडिओला @arunruby08 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “त्या नोटा पाहून १२ लाख रक्कम असेल असं वाटत नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण ८ वर्ष नवऱ्याला भनकही लागली नाही की त्याच्या खिशातून किती तरी पैसे गायब होतायेत”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “नोटावरील नंबर दिसत असेल तर फाटलेल्या नोटा RBI बदलून देईल”.

Web Title: Gonda woman secretly saved 12 lakh for 8 years rats chewed cash trunk viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
1

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
2

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
3

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
4

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.