गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात देशात 343 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आहे. या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4,46,71,562 वर पोहोचला आहे. शनिवारी देशात 389 नवे रुग्ण आढळले होते. दोन्ही दिवसांची तुलना करता आज कोरोनाबाधितांमध्ये 46 रुग्णांची घट झाल्याचं पाहायला मिळतय.
[read_also content=”मोठी बातमी! पोलिसांना जंगलात सापडलेल्या अवशेषांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला https://www.navarashtra.com/crime/the-dna-of-the-remains-found-by-the-police-in-the-forest-matched-that-of-shraddhas-father-nrps-348757.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे 5,263 सक्रिय रुग्ण आहेत. जे एकूण संक्रमणांपैकी 0.01% आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये 132 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5,30,612 वर गेली असून त्यात आणखी चार मृत्यूंचा समावेश आहे, ज्यात गेल्या 24 तासांत केरळमधील तीन आणि महाराष्ट्रातून एकाच्या मृत्युचा समावेश आहे.
[read_also content=”तासगांव तालुक्यात वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत ; ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांना ‘डाऊनी’चा धोका https://www.navarashtra.com/maharashtra/farmers-are-worried-due-to-climate-change-in-tasgaon-taluka-nrab-348780.html”]
मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार राष्ट्रीय कोरोना रुग्णांचा रिकव्हरी दर 98.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,35,687 वर पोहोचली आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.