Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक

यूपी एटीएसने मोठा दहशतवादी कट उधळला आहे. पाकिस्तानी दहशतवादी अबू बकरकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. दावा केला जात आहे की, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निशाण्यावर होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 02:15 PM
4 Arrested for Plot to Target Ajit Doval Trained by Pakistani Terrorist

4 Arrested for Plot to Target Ajit Doval Trained by Pakistani Terrorist

Follow Us
Follow Us:
  • अजित डोभालांसाठी बनत होता टाईम बॉम्ब
  • ४ संशयित अटकेत
  • पाक दहशतवादी अबू बकर देत होता प्रशिक्षण
उत्तर प्रदेश एटीएसने बिजनौरमधील जाळपोळीच्या घटनेनंतर या दहशतवादी मॉड्यूलचा तपास सुरू करून लखनौमधून ४ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यानंतर मोठ्या कटाचा उलगडा झाला असून पुण्यातील जाळपोळीची घटना देखील समोर आली आहे. या प्रकरणात पाकिस्तानातील दहशतवादी अबू बकर याचे नाव समोर आले आहे. अबू बकर हा या तरुणांना धार्मिक कट्टरतावादी व्हिडीओ पाठवून ब्रेनवॉश करत होता. त्यानंतर धार्मिक भावना भडकवून दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त करत होता. या मॉड्यूलशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू आहे. बिजनौरच्या किरतपूर येथील मोहल्ला झंडा भागात ४ मार्च २०२६ रोजी एका पिकअप वाहनात पेट्रोल टाकून आग लावण्यात आली होती. पोलिसांनी निमेश रस्तोगी यांच्या तक्रारीवरून १० मार्च रोजी गुन्हा दाखल करून अबुजर शमीम राईन (राहणार मोहल्ला अफगानान, किरतपूर) याला अटक केली होती.

डोभाल यांची माहिती गोळा करण्याचे काम

एटीएसने अटक केलेल्या ४ संशयितांनी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले. चौकशीत उघड झाले की, पाकिस्तानमध्ये बसलेल्या अबू बकरने त्यांना भारतातील गुप्तचर संस्था तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अनेक महत्वाच्या वयवत्तींविषयी माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. आरोपीच्या मोबाईलच्या सर्व हिस्ट्रीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तीची नावे आणि संवेदनशील कीवर्ड आढळले आहेत.

बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण

पाकिस्तानातील अबू बकरशी संबंधित आणि स्लीपर मॉड्यूलप्रमाणे काम करणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशातील या ४ संशयितांनी मोठा कट रचला होता. ते टाईम बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते. देशातील अनेक मॉल्स आणि इमारतीमध्ये साखळी स्फोट घडवण्याची त्यांची योजना होती. तसेच केमिकल बॉम्बद्वारे मॉलव्या पार्किंगमध्ये आग लावण्याचीही योजना होती. रेल्वे सिग्नल बॉक्स उडवून रेल्वे अपघात घडवण्याचाही कट होता.

डेटा आणि सर्च हिस्ट्री डिलीट

या कामासाठी ते अनेक वेळा दिल्लीलाही गेले होते, अटकेदरम्यान आरोपीनी मोबाईलमचील डेटा आणि सर्व हिस्ट्री डिलीट केली होती; मात्र फॉरेन्सिक टीमने तो डेटा पुन्हा मिळवला. सुरुवातीला एटीएसने अरयाबला अटक केली, त्यावेळी साकिबला याची माहिती मिळाली आणि त्याने तत्काळ मोबाईल फॉरमेंट करून सर्व हिस्ट्री व जुनी चेंट डिलीट केली. नंतर एटीएसने साकिबला अटक करून मोबाईलची तपासणी केली आणि फॉरेन्सिक टीमने डेटा रिकव्हर केला, त्यातून आरोपी संवेदनशील माहिती गोळा करत असल्याचे सष्ट झाले.

हिंद महासागर क्षेत्राच्या सुरक्षेवर मंथन; नवी दिल्लीत अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ‘CSC’ ची बैठक

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 4 arrested for plot to target ajit doval trained by pakistani terrorist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Ajit Doval news
  • Marathi News
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
1

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड
2

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
3

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

Onkar Bhojane On Milind Kawde:  दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर
4

Onkar Bhojane On Milind Kawde: दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.