नवी दिल्ली: संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी (Parliament Security Breach) मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. आता प्रकरणातील सहावा फरार आरोपी ललित झा याने आत्मसमर्पण केले आहे. ललितने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दुसरीकडे, लोकसभेत हे कृत्य करणाऱ्या इतर चार आरोपींची पटियाला कोर्टाने सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. चारही आरोपींवर दहशतवादविरोधी कायदा आणि UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
[read_also content=”अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल; अँजिओप्लास्टी करण्यात आली! https://www.navarashtra.com/movies/actor-shreyas-talapade-suffer-haeart-attack-hospitalized-in-mumbai-nrps-489013.html”]






