कलिंगड हे हंगामी पीक असून, उन्हाळ्यात त्याला विशेष मागणी असते. ईदपर्यंत चांगले भाव असलेले कलिंगड आता 5 ते 6 रूपये किलो मिळत असल्याने शेतकऱ्यांना ते तोडण्याच्या मजुरीसाठीही परवडत नाहीत. तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व बदलते वातावरण याचा परिणाम कलिंगडाचे भाव घसरणीवर झाला असल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकरी कलिंगड हे हंगामी पीक घेण्यासाठी शेती करतात. तीन महिन्याचे हे पीक असल्याने हाताशी दोन पैसे येतील म्हणून हजारो रूपये खर्च करून कलिंगडाची लागवड करतात. मात्र यंदा ऐन मागणीच्या काळातच अवकाळी पाऊस झाल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. एकतर शेतातील कलिंगडाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. दुसरे म्हणजे वातावरण बदलामुळे तापमानात घसरण झाल्याने बाजारात कलिंगडाचे भाव गडगडले आहेत. चिल्लर बाजारातच कलिंगड 15 रूपयांना दोन किलो मिळत असल्याने ठोक बाजारात 5 ते 6 रुपये भाव मिळत आहे. सध्या कलिंगडाचा हंगाम सुरू असताना बाजारात दर मात्र घसरलेले आहेत.