वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलंय गॅस सिलेंडरची टंचाई आणि सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने थेट जिल्हाधिकारी कार्यालय समोरच चूल पेटवली आहे. गॅस सिलेंडर मिळत नसल्याने पुन्हा एकदा लाकूड फाटा गोळा करून स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे त्यामुळे हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलय.आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती मुळे देशासह राज्यात गॅस सिलिंडर चा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पहाटेपासूनच राज्यातील नागरिक गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लावत आहे या बाबीचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने नरेंदर कब देंगे सिलेंडर या शीर्षकाखाली आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे यावेळी आंदोलन स्थळी चुलीवर भाकर व ठेचा बनवून राज्य व केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला राज्यातील व देशातील गॅस टंचाई लवकरात लवकर दूर करण्यात यावी ही मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.